Rajan salvi: राजन साळवींच्या नाराजीचे कारण समोर आलं, मोठ्या निर्णयाचे ही दिले संकेत

विधानसभा निवडणुकीत राजापूर विधानसभा मतदार संघातून राजन साळवी यांचा पराभव झाला. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किरण सामंत यांनी त्यांचा पराभव केला.

जाहिरात
Read Time: 2 mins
रत्नागिरी:

शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी हे नाराज असल्याची चर्चा आहे. ते भाजपच्या वाटेवर असल्याचेही बोलले जाते. त्यात त्यांनी आपण नाराज नाही. पक्ष बदलणार नाही असं ही म्हटलं होतं. त्यानंतर त्यांनी राजापूर आणि लांज्यातील पदाधिकाऱ्यां बरोबर संवाद साधला. कार्यकर्त्यांनी तुम्ही जो निर्णय घ्याल त्याला आमचा पाठिंबा असेल. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत अशी ग्वाही कार्यकर्त्यांनी यावेळी दिली. त्यावर साळवी यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेईन असं कार्यकर्त्यांना सांगत, आपली पुढची दिशा काय असेल याचे जणू संकेतच दिले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

विधानसभा निवडणुकीत राजापूर विधानसभा मतदार संघातून राजन साळवी यांचा पराभव झाला. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किरण सामंत यांनी त्यांचा पराभव केला. हा पराभव राजन साळवी यांच्या जिव्हारी लागला आहे. कोकणातून ठाकरेंची सेना साफ झाली. केवळ एकच आमदार संपूर्ण कोकणातून निवडून आला. अशा स्थितीत पुढची वाटचाल कशी करायची असा प्रश्न राजन साळवी यांच्या समोर होता. त्यात त्यांच्या पक्ष बदलाच्या बातम्याही समोर आल्या. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते संभ्रमात होते. 

ट्रेंडिंग बातमी - Devendra Fadnavis: कलंक ते टरबूजा म्हणून हिणवले, तेच विरोधक फडणवीसांच्या प्रेमात का पडले?

अशा स्थितीत राजन साळवी यांनी कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधला. मी योग्य वेळी योग्य निर्णय घेईन असं राजन साळवी म्हणाले. माझ्या पराभवाला वरिष्ठ नेते कारणीभूत आहेत. आपण त्यांचे नाव घेणार नाही. माझ्या पराभवाला कारणीभूत कोण हे शोधणे गरजेचे आहे असे साळवी म्हणाले. राजन साळवी यांच्यावर अन्याय झाला आहे, अशी पदाधिकाऱ्यांची भावना आहे. त्यामुळेच आपल्यावर योग्य निर्णय घेण्यासाठी दबाव आहे असं ही साळवी म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - Mumbra Contro: मुंब्र्यात मराठीचा आग्रह, जितेंद्र आव्हाड म्हणतात हा तर...

गेले काही दिवसा पासून साळवी यांच्या प्रवेशाबद्दल चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचा आग्रह होता की त्यांच्या बरोबर संवाद साधावा. त्यामुळेच आपण राजापूर आणि लांजामधील पदाधिकाऱ्यां बरोबर संवाद साधला, असं साळवी म्हणाले. तुम्ही योग्य निर्णय घ्या. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. असं मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सांगितलं. त्यामुळे आपण पुढील निर्णय घेण्यास सक्षम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 

Advertisement