जोडे मारो आंदोलन, मविआचा मोर्चा पोलीस रोखणार? हुतात्मा चौकात काय स्थिती?

हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया पर्यंत मविआचे नेते मोर्चाही काढणार आहेत. मात्र हा मोर्चा रोखला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मालवणच्या राजकोटवर कोसळला. त्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.शिवप्रेमींनीही नाराजी व्यक्त केली. त्यानतंर महाविकास आघाडीने सरकारचा निषेध करण्यासाठी जोडे मारो आंदोलन पुकारले आहे. आज  हे आंदोलन केले जाणार आहे आहे.  हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया पर्यंत मविआचे नेते मोर्चाही काढणार आहेत. मात्र हा मोर्चा रोखला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी जवळपास 5 हजार पोलीसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या मोर्च्यात मविआचे बडे नेते सहभागी होणार आहेत. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेचा निषेध म्हणून महाविकास आघडीच्या वतीने आज महायुती सरकारच्या विरोधात ‘जोडे मारो' आंदोलन करण्यात येणार आहेत. ‘गेट वे ऑफ इंडिया' येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन होणार आहे. सकाळी दहा वाजता महाविकास आघाडीचे नेते हुतात्मा स्मारक येथे जमणार आहेत. स्मारकाला वंदन करून आघाडीचे नेते, कार्यकर्ते व शिवप्रेमी ‘गेट वे ऑफ इंडिया'कडे जातील. तेथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होतील. त्यानंतर सरकारच्या प्रतिमेला ‘जोडे मारो' आंदोलन करतील. 

ट्रेंडिंग बातमी - मालेगावात गाऊन गँगचा धुमाकूळ ! चोरीसाठी नवा फंडा, नागरिकांमध्ये भीती

या आंदोलनात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यां बरोबरच शिवप्रेंमी या आंदोलनात सहभाग नोंदवतील. यामुले पोलीसांनीही खबरदारी घेतली आहे. महाविकास आघाडीच्या मोर्च्यासाठी एकूण 5 हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. शिवाय  महाराष्ट्र पोलीस, वाहतूक विभाग, मसुब विभाग,ATS, जवळपास या संपूर्ण मार्गावर 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग बातमी - विधानसभेला किती जागा लढणार? अजित पवारांनी पहिल्यांदाच आकडा सांगितला

या आंदोलनात महाविकास आघाडीचे बडे नेते सहभागी होणार आहेत. शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले हे मविआचे नेते या आंदोलनात असतील. यामाध्यमातू मविआचा शक्तीप्रदर्शन करण्याचाही प्रयत्न असेल. निवडणुकीच्या तोंडावर हा मुद्दा चांगलाच तापला आहे. याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही जाहीर पणे माफी मागीतली आहे. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही माफी मागितली आहे. आता मविआकडून हा मोर्चा काढला जात असल्याने आणखी वातावरण बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही.  

Advertisement