Shivsena News: 'बाळासाहेब गेले त्याच वेळी शिवसेना संपली', 'या' नेत्याच्या वक्तव्याने वाद उफाळणार?

उद्धव ठाकरे यांच्यामुळेच त्यांची शिवसेना पुढच्या निवडणुकीपर्यंत राहणार नाही. त्यांनी अनेक चांगल्या लोकांचा घात केला आहे, असं ही ते म्हणाले.

जाहिरात
Read Time: 2 mins
शिर्डी:

शिवसेना हा पक्ष पुढच्या निवडणुकीत दिसणार नाही. ज्या वेळी बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले त्याच वेळी शिवसेना संपली असं वक्तव्य खासदार नारायण राणे यांनी केले आहे. त्यांच्या यावक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यत आहे. राणे हे शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी पत्रकारांबरोबर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. शिवाय त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर ही सडकून टिका केली.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

 नारायण राणे यांनी यावेळी आपण शिवसेनेत जवळपास 39 वर्ष काम केल्याचं सांगितलं. बाळासाहेबांच्या सल्ल्याने आपण काम करत होतो. पण चांगल्या कामात व्यत्यय आणणे हे उद्धव ठाकरे यांचं काम होतं. त्यांच्या या वागण्यामुळेच शिवसेना संपत चालली आहे. पुढच्या निवडणुकीपर्यंत शिवसेना पक्ष राहणार नाही असं भाकीत ही त्यांनी यावेळी वर्तवलं. ज्या वेळी बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झालं त्याच वेळी खऱ्या अर्थाने शिवसेना संपली असं ही ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी -  Cyber crime: डिजिटल अरेस्टची भीती दाखवून जेष्ठ नागरिकाला 3 कोटींचा गंडा

उद्धव ठाकरे यांच्यामुळेच त्यांची शिवसेना पुढच्या निवडणुकीपर्यंत राहणार नाही. त्यांनी अनेक चांगल्या लोकांचा घात केला आहे. त्यामुळे अनेक जण त्यांना आतापासून सोडून जात आहेत. अनेक जण सोडूनही गेले आहेत. बाळासाहेब ठाकरे होते तो पर्यंत शिवसेना होता. आता ती शिल्लक राहिली नाही असंही राणे म्हणाले. शिवसेना संपायला उद्धव ठाकरे जबाबदार असल्याचं ही ते म्हणाले.  

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Fake Doctor News: 'मी लंडनचा डॉक्टर' सांगून हार्ट सर्जरी केली, 7 जणांचा जीव गेला.. 'मुन्नाभाई'चा भयंकर प्रताप!

यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर ही टीका केली. संजय राऊत हा व्यक्ती दुकान चालवतो. सका़ळी उठला की मी असं केलं तसं केलं असं सांगत असतो. राऊत यांचं देशासाठी, राज्यासाठी कर्तृत्व सांगा असा प्रश्न त्यांनी केला. त्यांचं विधायक काम नाही. शेतकरी कर्जाच्या पैशातून साखरपुडा व लग्ने करतात असं वक्तव्य कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर बोलताना नारायण राणे यांनी माणिकराव कोकाटे यांच वक्तव्य चुकीचं असल्याचं म्हटलं. कर्जमाफीचं अश्वासन सरकारने दिलं आहे ते पूर्ण केलं जाईल असंही राणे म्हणाले. 
 

Advertisement