Narayan Rane: दोन्ही शिवसेना एकत्र येणार? नारायण राणेंनी दिली आतली बातमी

नारायण राणे यांनी शिवसेनेत जवळपास चाळीस पेक्षा जास्त वर्ष काम केलं. ते मंत्री, मुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेते या पदावर राहीले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
रत्नागिरी:

शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट हे एकत्र येण्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तूळात होत आहे. महायुतीत एकनाथ शिंदे हे नाराज आहेत. त्यात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दोन्ही शिवसेना एक झाल्या पाहिजेत. त्यासाठी आपण प्रयत्न करु असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे या चर्चेला आता बळ मिळत आहे. एकनाथ शिंदे यांनीही यावर कोणतीही प्रतिक्रीया दिली नाही. पण भाजपमधून याबाबत प्रतिक्रीया उमटल्या आहेत. त्यात आता भाजपनेते आणि खासदार नारायण राणे यांनी पुढे काय होणार याचं भाकीत व्यक्त केलं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नारायण राणे यांनी शिवसेनेत जवळपास चाळीस पेक्षा जास्त वर्ष काम केलं. ते मंत्री, मुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेते या पदावर राहीले आहेत. त्यामुळे शिवसेनेचे बारकावे त्यांना माहित आहेत. त्यात आता एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र येण्याची चर्चा राजकीय वर्तूळात होत आहे. त्यावर नारायण राणे यांनी पुढे काय होवू शकतं याचं भाकीत केलं आहे. राणे म्हणाले माझ्या मते दोन्ही शिवसेना एकत्र येऊ शकत नाहीत. तसं होणार नाही. ही केवळ भविष्यवाणी आहे बाकी काही नाही असं म्हणत त्यांनी यावर अधिक बोलण्याचं टाळलं आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Mahayuti News: ठाकरे- शिंदे एकत्र येणार? शिरसाटांच्या 'त्या' वक्तव्यामुळे महायुतीत जुंपली

 मात्र सध्या सुरु असलेल्या चर्चेवर बोलताना संजय राऊत यांना चांगलं दिसत नाही. ते ज्या बातम्या देत आहेत, त्या सगळ्या खोट्या असतात. दिशाभूल करणाऱ्या  असतात. असं नारायण यांनी सांगितलं.  तसेच उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे चांगलं काम करत आहेत. काही दिवस ते गप्प होते. पण पुन्हा कामाला लागले आहेत. त्यामुळे राऊत यांना चांगलं बगवत नाही. ते चांगलं कधीही बोलत नाही. असं असलं तरी एक दिवशी त्यांना चांगलं बोलायला आम्ही शिकवू,असा टोलाही राणे यांनी यावेळी लगावला.

ट्रेंडिंग बातमी - CIDCO Lottery 2025 : सिडकोचे माझे पसंतीचे घर! प्रतिक्षा संपली लॉटरीची तारीख ठरली

दरम्यान येणाऱ्या पावसाच्या आत मुंबई गोवा महामार्गाचं बहुतांश काम करण्याचं ठेकेदारांनी सांगितलं आहे. त्यामुळे हा मार्ग निश्चितच मार्गत्वास जाईल असंही ते म्हणाले. नालासोपाऱ्यामध्ये शिवसेना उबाठा गटाच्या नेत्याने खंडणी मागण्याचे प्रकरण समोर आले आहे. त्यावर बोलताना राणे म्हणाले की यामुळे त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे. खंडणीवरच त्यांची रोजीरोटी सुरू आहे अशी टीकाही त्यांनी केली.