जाहिरात

लाडकी बहीण- भावा वरून राज यांची टोलेबाजी, पवार-ठाकरेंना सुनावले

आता राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजने वरून टोलेबाजी केली आहे. शिवाय या योजने बाबत त्यांनी काही प्रश्नही उपस्थित केले आहेत.

लाडकी बहीण- भावा वरून राज यांची टोलेबाजी, पवार-ठाकरेंना सुनावले
मुंबई:

लाडक्या बहीण योजनेचा मोठा प्रचार आणि प्रसार केला जात आहे. महायुती सरकारची ही योजना गेम चेंजर आहे अशी चर्चाही केली जात आहे. जसा या योजनेचा प्रचार आणि प्रसार होत आहे तशी ही योजनेची टिंगलही केली जात आहे. काहींनी टिकाही केली आहे. त्यात आता राज ठाकरे यांनी या योजने वरून टोलेबाजी केली आहे. शिवाय या योजने बाबत त्यांनी काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजनेचा मुद्दा चांगलाच गाजणार हे निश्चित आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राज ठाकरे अमेरिकेतून नुकतेच मुंबईत परतले. मुंबईत परतल्यानंतर इकडे काय चालले आहे याचा आढावा त्यांनी घेतला. अमेरिकेत कसे सुरू आहे. तिथे पर्यावरणाबाबतीत लोक कसे सजग आहेत. पाण्याचे त्यांना किती महत्व आहे याची माहिती ते कार्यकर्त्यांना देत होते. तिकडे काय सुरू आहे हे सांगत असताना आपल्याकडे काय सुरू आहे. तर आपल्याकडे लाडकी बहीण, लाडका भाऊ सुरू आहे. जर लाडका भाऊ बहीण एकत्र राहीले असते तर दोन दोन पक्ष कशाला फुटले असते. त्यासाठी योजना कशासाठी पाहीजे अशी टोलेबाजी राज यांनी यावेळी केली. 

ट्रेंडिंग बातमी - Live Update : पुण्यात 'जल'कल्लोळ, वाहनं पाण्याखाली, शाळांना सुट्टी; इतर जिल्ह्यांमध्ये काय आहे स्थिती?

लाडकी बहीण योजना सरकारने जाहीर केली. या योजनेत महिलांना दिड हजार रूपये महिन्याला दिले जाणार आहेत. पण हे देण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत का? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला. शिवाय या योजनेसाठी पैसे आणणार कुठून असा सवालही त्यांनी केला. पावसामुळे रस्त्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. ते बुजवण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. मग ते लाडक्या बहीणीसाठी कुठून पैसे आणणार आहेत अशी विचारणा त्यांनी केली.   

ट्रेंडिंग बातमी - तरुणाने अटल सेतूवर गाडी थांबवली, अन् क्षणाचाही विचार न करता केले धक्कादायक कृत्य

मनसेने मुळ गोष्टींकडे लक्ष दिले पाहीजे असा सल्ला राज यांनी या कार्यकर्ता मेळाव्यात दिला. एकमेकांवर टिका करून काही होणार नाही. टिका करून मुळ मुद्द्यावरून लक्ष भरकटवले जाते. त्यातून मिळणार काहीच नाही. त्यामुळे जनतेच्या प्रश्नावर लढा तोच आपला विधानसभेचा अजेंडा असेल असेही त्यांनी सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर मनसेच्या कार्यकर्त्यांना सत्तेत बसवायचे आहे असेही ते म्हणाले. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
तळकोकणात राणेंना धक्का, तर शिंदे सेनेचे टेन्शन वाढणार? ठाकरेंच्या गळाला बडा नेता
लाडकी बहीण- भावा वरून राज यांची टोलेबाजी, पवार-ठाकरेंना सुनावले
Congress Rashmi Barve caste verification certificate is valid by Mumbai High Court
Next Article
एका चुकीमुळे लोकसभेला संधी हुकली, कोर्टाने चूक सुधारली, दंडही ठोठावला