सुजाता द्विवेदी, प्रतिनिधी
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'बाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सरकारी पातळीवर या योजनेत मोठे बदल करण्यात आले आहेत. राज्य सरकारकडून डिजिटल शुद्धीकरण (Digital Purge) अभियान राबवित तब्बल ९० लाख महिलांची नावं लाभार्थी यादीतून हटविण्यात आली आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या २.६ कोटींवरुन १.५३ कोटींवर घसरली आहे. ज्यामुळे राज्यातील लाखो कुटुंबात खळबळ उडाली आहे.
राज्याच्या तिजोरीत १७ हजार कोटींची बचत
सरकारच्या या निर्णयाचा सर्वात मोठा परिणाम बीड जिल्ह्यावर पाहायला मिळत आहे. येथे एका ऑडिटमध्ये २.८३ लाख महिलांना अपात्र घोषित करण्यात आलं आहे. सरकार या प्रिसिजन-टार्गेटिंग रणनीतीअंतर्गत अर्जदारांचा डेटा थेट आयकर नोंदी आणि (RTO) आरटीओ डेटाबेसमधून पडताळला गेला आहे.
ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न २.५ लाखांहून अधिक आहे किंवा ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे, त्यांना या यादीतून बाहेर काढण्यात आलं आहे. सरकारने दावा केला आहे की, या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीत १७ हजार कोटींची बचत होईल. मात्र या प्रक्रियेत १२ हजारांहून अधिक पुरुष आणि अनेक सरकारी कर्मचाऱ्यांच्या बनावट नोंदी देखील आढळून आल्या आहेत. मात्र या कडक नियमांनुसार, लाखो गरजवंत महिला कायदपत्रांच्या जाळ्यात अडकल्या आहेत.
स्वत: हक्क कसा मिळवाल?
वगळण्यात आलेल्या महिलांसाठी यादीत पुन्हा सामील होण्याचा मार्ग कठीण आहे. सरकारने e-KYC अनिवार्य केलं आहे. 'नारी शक्ति दूत' अॅप (Nari Shakti Doot App) किंवा स्थानिक सेवा केंद्रांवर जाऊन e-KYC करावं लागेल.
पुन्हा लाभार्थी होण्यासाठी काय कराल? l Want to be a beneficiary again?
शेवटची तारीख - अपात्र घोषित केलेल्या महिला ३१ मार्च २०२६ पर्यंत सुधारणा करू शकतात.
स्टेटस चेक - अधिकृत पोर्टल ladakibahin.maharashtra.gov.in वर लॉगइन करा आणि "Remarks" कॉलम पाहा. तेथे तुम्हाला रिजेक्शनचं नेमकं कारण (उदा. डॉक्युमेंट मिसमॅच किंवा अपूर्ण e-KYC) कळू शकेल.
सुधार प्रक्रिया - जर काही तांत्रिक कारणामुळे अर्ज रद्द करण्यात आला असेल पोर्टलवर "Edit" फिचरचा उपयोग करून आपलं आधार कार्ड, रेशन कार्ड आणि बँक पासबुकचा स्पष्ट फोटो पुन्हा अपलोड करा.
ऑफलाइन अर्ज - जर ऑनलाइन अडचण येत असेल तर तातडीने आपल्या जवळील सेतु सुविधा केंद्र किंवा स्थानिक अंगणवाडी सेविकांकडे प्रत्यक्ष अपील सादर करा.
बँक लिंकिंग - तुमचं बँक खातं Aadhaar-seeded (NPCI mapped) असेल हे तपासून पाहा. कारण डीबीटीशिवाय पेमेंट शक्य होणार नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world