कांदेंच्या मतदार संघात भुजबळांचा वावर वाढला, नांदगावमध्ये 'हायव्होल्टेज' ड्रामा

विधानसभेच्या तोंडावर तसाच संघर्ष राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटात होण्याची दाट शक्यता आहे. त्याला निमित्त आहे नांदगाव विधानसभा मतदार संघ.

जाहिरात
Read Time: 3 mins
नाशिक:

लोकसभा निवडणुकीवेळी नाशिक लोकसभेसाठी शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष निर्माण झाला होता. ही जागा राष्ट्रवादीला मिळावी यासाठी छगन भुजबळ आग्रही होते. अगदी शेवटच्या क्षणी ही जागा शिवसेना शिंदे गटाला देणात आली. निकालानंतर शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव झाला. आता विधानसभेच्या तोंडावर तसाच संघर्ष राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटात होण्याची दाट शक्यता आहे. त्याला निमित्त आहे नांदगाव विधानसभा मतदार संघ. या मतदार संघात सध्या हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव विधानसभा मतदार संघ येतो. या मतदार संघात विद्यमान आमदार सुहास कांदे हे आहेत. शिवसेनेत फुट पडल्यानंतर कांदेंनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली. त्यामुळे महायुतीत हा मतदार संघ शिंदेंच्या पारड्यात जाईल हे जवळपास निश्चित आहे. असं असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसचा हा पारंपारीक मतदार संघ आहे. त्यामुळे तो इतक्या सहजासहजी सोडण्यास राष्ट्रवादी काँग्रेस तयार नाही. या मतदार संघातून पंकज भुजबळ हे दोन वेळा निवडून गेले आहेत. त्यामुळे समीर भुजबळ आता इथून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यांनी या मतदार संघावर दावा सांगत प्रचारही सुरू केला आहे.

ट्रेंडिंग बातमी - 'फडणवीसांनी दबाव टाकून आमचे घर फोडले' बड्या नेत्याचा बडा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष  माजी खासदार समीर भुजबळ नाशिकच्या नांदगाव विधानसभा मतदार संघात चांगलेचे सक्रिय झाले आहे. भुजबळ यांनी गणोशोत्सव काळात नांदगाव मतदार संघातील विविध गणेश मंडळांना भेटी दिल्या. तर ईदच्या जुलूसमध्ये मनमाडमध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांचे मुस्लिम बांधवांनी स्वागत आणि सत्कार ही केला. त्यातच विविध सण उत्सव काळात त्यांचे  शुभेच्छा फलक मतदार संघात झळकू लागले आहेत. ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात समीर भुजबळ नांदगाव मतदार संघात सक्रिय झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

ट्रेंडिंग बातमी - 'उद्धव ठाकरे यांनी आदित्यच्या डोक्यावर हात ठेवून सांगावे की...' पाटलांचे थेट आव्हान

समीर भुजबळ नांदगावमधून उमेदवारी करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पंकज भुजबळ हे दोनदा नांदगावमधून आमदार होते. याबाबत छगन भुजबळ यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे सुहास कांदे यांचे टेन्शन मात्र वाढले आहे. लोकांचे प्रेम आहे, लोक बोलवतात मग जायचे नाही का? असा सवाल  छगन भुजबळ यांनी केला आहे. समीर भुजबळ नांदगावमधून निवडणूक लढवतील का? याबाबत आपल्याला कल्पना नाही असही त्यांनी स्पष्ट केलं. मात्र त्यांच्या या विधानाने संभ्रम मात्र नक्कीच वाढला आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Manoj Jarange : मनोज जरांगे यांची तब्येत खालावली; आज बीड आणि धाराशिव बंदची हाक

शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे आणि भुजबळ यांचे नाते हे विळ्या भोपळ्याचे आहे. एकमेकाचे कट्टर विरोधक म्हणून त्यांना ओळखलं जातं. महाविकास आघाडीत असतानाही सुहास कांदे यांनी भुजबळांना जाहीर पणे विरोध केला होता. आताही भुजबळांनी कांदेंच्या मतदार संघात वावर वाढवला आहे. त्यामुळे कांदेंचे टेन्शन नक्कीच वाढले आहे. महायुतीत ही जागा कोणाकडे जाते या कडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. तिकीट कोणालाही मिळाले तरी भुजबळांच्या निशाण्यावर कांदे हेच असणार हे स्पष्ट आहे.