राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पवार कुटुंबात दुरावा निर्माण झाला आहे. वरवर सर्व काही ठिक असल्याचं दाखवलं जात असलं तरी तसं तशी स्थिती निश्चितच नाही. त्याचा प्रत्येय पुन्हा एकदा आला. बारामती तालुक्यातल्या अंजनगाव इथल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे एकत्र आले होते. त्यावेळी दोघांनी एकमेकांना नमस्कार केला मात्र बोलण्याचं दोघांनीही टाळलं. हा दुरावा कॅमेऱ्यातही टिपला गेला. त्यामुळे अजित पवारां बरोबरचा अबोला कायम असल्याचे दिसून आले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बारामती तालुक्यातील अंजनगाव या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते महावितरणच्या उपकेंद्र आणि उमाजी नाईक सभागृहाचे उद्घाटन झालं. यावेळी अजित पवार आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे हे एकत्र आल्याचे पाहायला मिळालं. दोघेही बऱ्याच दिवसांनी एकाच कार्यक्रमाला एकत्र दिसणार होते. त्यामुळे दोघांचे समर्थकही त्या ठिकाणी उपस्थित होते. अजित पवार येण्या आधीच सुप्रिया सुळे या उद्घाटन ठिकाणी उपस्थित होत्या. अजित पवारांची सर्वच जण त्यावेळी वाट पाहात होते.
ट्रेंडिंग बातमी - India Alliance: इंडिया आघाडीत खरोखर फूट पडली आहे का? पडद्यामागे काय घडतंय?
अजित पवार ज्यावेळी आले त्यावेळी एका बाजूला सुप्रिया सुळे उभ्या होत्या. त्यांच्या समोर अजित पवार आल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना नमस्कार केला. त्यानंतर अजित पवारांनीही त्यांना नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर अजित पवार उद्धाटनासाठी पुढे गेले. सुप्रिया सुळे मात्र तिथेच उभ्या होत्या. त्यानंतर एका कार्यकर्त्यांने त्यांना पुढे येण्याचा आग्रह केला. त्यानंतर त्या पुढे गेल्या. उद्घाटनही झालं. पण अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकमेकां बरोबर बोलले नाहीत की एकमेकांची विचारपूस केली नाही.
या कार्यक्रमाचं खासदार सुप्रिया सुळे यांना उशिरानी निमंत्रण देण्यात आलं होतं. मला अगोदरच्या दिवशी निमंत्रण दिलं असतं तर बरं झालं असतं असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या. शिवाय शासकीय कार्यक्रमाची निमंत्रण वेळेत मिळावीत अशा पद्धतीची लिखित तक्रार ही सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे एका पत्राद्वारे केलेले आहे. दरम्यान या कार्यक्रमात बहिण भाऊ एकत्र आले पण त्यांच्यातला अबोला दिसून आला. त्यामुळे उद्घाटना पेक्षा त्यांच्यातील अबोल्याचीच चर्चा बारामतीत चांगलीच रंगली होती.