अपघात बावनकुळेंच्या गाडीचा, जुंपली मात्र मविआच्या नेत्यांची

काँग्रेसचे आमदार भाजपला मदत करत आहेत का अशी विचारणा सुषमा अंधारे यांनी केली आहे. दरम्यान अंधारे यांच्या या आरोपानंतर ठाकरे यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
नागपूर:

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे यांच्या गाडीचा अपघात झाला होता. त्याच्या गाडीने अनेक गाड्यांना टक्कर दिली होती. त्यात काही जण जखमी झाले होते. यानंतर पोलीसांनी गुन्हा दाखल केला. मात्र त्यातून बावनकुळेंच्या मुलाचे नाव वगळण्यात आले आहे. यावरून आता महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये जुंपही आहे. ही गाडी संकेत बावनकुळे चालवत नव्हता. असे वक्तव्य काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी केले आहे. तर काँग्रेसचे आमदार भाजपला मदत करत आहेत का अशी विचारणा सुषमा अंधारे यांनी केली आहे. दरम्यान अंधारे यांच्या या आरोपानंतर ठाकरे यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

नागपुरात हा अपघात झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले होते. बावनकुळेंच्या मुलावर गुन्हा दाखल झाला पाहीजे अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाने केली होती. गाडीत असलेले सर्व जण दारूच्या नशेत होते असाही आरोप झाला. पोलीसांनी गाडी आणि गाडी चालवणाऱ्यांना ताब्यात घेतले. मात्र गुन्हा नोंद करत असताना त्यातून बावनकुळेंच्या मुलाचे नाव मात्र वगळले. यावर नागपूरचे काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी संकेत बावनकुळे हा गाडी चालवत नव्हता. त्याच्या जागी दुसरे कोणी असते तर सोडले नसते असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी जोरदार टिका केली आहे. 

ट्रेंडिंग बातमी - हर्षवर्धन पाटील लढणार की माघार घेणार? इंदापूर विधानसभा कोणाच्या पारड्यात?

विकास ठाकरे यांची काय मजबूरी आहे. त्यामुळे ते संकेत बावनकुळेंना वाचवत आहेत. विकास ठाकरे यांच्याकडे जर पुरावे आहेत तर ते अपघातानंतर 36 तास गप्प का होते असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. स्थानिक राजकारणामुळे त्यांनी अशी भूमिका घेतली का असा प्रश्नही त्यांनी केला आहे. कायदा सर्वांसाठी सारखा असला पाहिजे,बावनकुळे दबक्या आवाजात सांगतात की निष्पक्ष चौकशी व्हावी पण एफआयआरमध्ये संकेतचं नाव नाही. त्याचं नाव टाकू नये यासाठी कोणाचा दबाव आहे अशी विचारणाही त्यांनी केलाय. शिवाय ज्या बारमध्ये संकेत गेला होता त्या ठिकाणी तो दुध पिण्यासाठी गेला होता का असे प्रश्नही त्यांनी यानिमित्ताने विचारले आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - केज मतदार संघात भाजपची डोकेदुखी वाढणार? राखीव मतदार संघात कोण बाजी मारणार?

दरम्यान आपण कुठलीही वेगळी भूमिका घेतलेली नाही असे विकास ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. कोणी गुन्हा केला असेल तर त्याला शिक्षा व्हावी, हीच माझी भूमिका आहे असे विकास ठाकरे म्हणाले आहेत. माझ्यावर चाळीस केसेस आहेत. भाजपशी कित्येक वर्षे लढतो आहे. बाहेरून येणाऱ्या कुणाही पेक्षा हा एकटा विकास ठाकरे भारी आहे, त्यामुळे भाजपला मदत करत आहे या सुषमा अंधारे यांच्या आरोपांना त्यांनी फेटाळून लावले आहे. सुषमा अंधारे या माझ्यासाठी सन्माननीय ताई आहेत असंही ते म्हणाले.