उत्तर भारतात सध्या बऱ्याच ठिकाणी कडाक्याची थंडी आहे. असं असताना बिहारची राजधानी पाटण्यात मात्र राजकीय वातावरण चांगलेच गरम आहे. बिहार लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर पाटण्यात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या विद्यार्थ्यांवर तिन वेळा लाठीचार्जही करण्यात आला. त्यानंतरही हे आंदोलन मागे घेण्यात आले नाही. त्यामुळे नितीश कुमार पुन्हा एकदा पलटी मारणार अशी चर्चा पाटण्यात आले. त्यामुळेही वातावरण तापलं आहे. असा स्थितीत आरजेडी नेता तेजस्वी यादव यांच्या वक्तव्याने सर्वांच्यात भुवया उंचावल्या आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांना भाजपने मुख्यमंत्रिपदासाठी संधी दिली नाही. बिहार विधानसभा निवडणुकीनंतर भाजप नितीश कुमार यांना संधी देणार नाही असा संशय जनता दल युनायटेडच्या नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे नितीश कुमार विधानसभा निवडणुकीच्या आधी इंडिया आघाडीत परत येण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. मात्र बिहारच्या स्थानिक नेत्यांनी निवडणुकीनंतर सत्ता आल्यास नितीश कुमार हेच मुख्यमंत्री असतील. एनडीएचे नेतृत्व नितीश कुमारच करतील असं सांगितलं आहे. या सर्व चर्चा सुरू असताना तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्यासाठी आरजेडीचे दरवाजे बंद असल्याचं वक्तव्य केलं आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय दोन्ही पक्षांच्या बैठकीत केला जाईल असे वक्तव्य केले होते. त्यानंतर महाराष्ट्रा प्रमाणेच भाजप बिहारमध्ये पाऊल उचलेल अशी चर्चा सुरू झाली. महाराष्ट्रात जास्त जागा जिंकल्यानंतर भाजपने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केले. मात्र निवडणूक ही एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर आणि नेतृत्वात लढली गेली. मात्र बिहारचा इतिहास पाहात भाजपने बिहारमध्ये तरी असा प्रयोग केलेला नाही. 2020 मध्ये भाजपने जास्त जागा जिंकूनही नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्री केले होते.
अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर बिहारच्या स्थानिक नेत्यांनी सारवासारव केली आहे. एनडीएचे बिहारमध्ये नितीश कुमारच नेतृत्व करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. शिवाय तेच मुख्यमंत्री होतील असंही ते म्हणाले. असं असलं तरी अमित शाह यांच्या वक्तव्याबाबत त्यांनी अधिक काही बोलणं टाळलं आहे. त्यात केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी केली. त्यांचे हे विधान म्हणजे नितीश कुमारांना राजकारणातून निरोप देण्याच्या दृष्टीने होते अशी चर्चा राजकीय वर्तूळात रंगली आहे.
दरम्यान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांची नितीश कुमार यांनी दिल्लीत जावू भेट घेतली. दिल्लीत असतानाही यावेळी नितीश यांनी पंतप्रधान मोदी, अमित शाह, जे. पी नड्डा यांची भेट घेण्याचे टाळले. त्याची भेट न घेता ते पाटण्यात परत आले. त्यानंतर नितीश कुमार आणि भाजप यांचे संबध कुठे तरी बिघडले आहेत का याची चर्चा सुरू झाली. शिवाय तेजस्वी यादव तरुणांना आपल्याबाजूने करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.