Thalapathy Vijay Oath Ceremony : थलपती विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्यात अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली. परंतु,अभिनेत्री त्रिशा कृष्णनच्या उपस्थितीची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली. या सोहळ्यादरम्यान त्रिशा विजय यांची आई शोभा चंद्रशेखर यांना भेटली आणि बघता बघता तिचे व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाले. जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये शपथविधीचा हा सोहळा रंगला. यावेळी त्रिशाने विजय यांची आई शोभा यांची भेट घेतली. दोघींनीही व्हिआयपी सीटवर बसण्याआधी एकमेकींना गळाभेट दिली.
या सोहळ्यासाठी त्रिशाने सोनेरी रंगाचे मोटिफ्सचे ब्लाऊज आणि फिकट हिरव्या रंगाची साडी परिधान केली होती. पण या सोहळ्या दरम्यान त्रिशा खूप भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं. तिने केसांना पांढऱ्या रंगाचा गजराही लावला होता. त्यामुळे तिचं सौंदर्य आणखी खुललं होतं. तसच रेड स्टोन ज्वेलरी आणि हलक्या मेकअपमध्ये त्रिशा पारंपारिक लूकमध्ये सजली होती.
नक्की वाचा >> Amravati News: 15 मित्रांच्या किंकाळ्या अन् आरडाओरडा, 2 सख्ख्या भावंडांसह एकापाठोपाठ 4 जणांचा जीव गेला
त्रिशाच्या चेहऱ्यावर हास्य फुललं आणि..
विजय आणि त्रिशा तामिळ फिल्म इंडस्ट्रीच्या सर्वात लोकप्रिय ऑन-स्क्रीन जोड्यांपैकी एक आहे.त्रिशाने घिल्ली,थिरुपाची,आथी,कुरुवी आणि नुकतच लियोसारख्या सिनेमात झळकले आहेत.सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की,विजय हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असताना त्रिशाच्या चेहऱ्यावर हास्य फुललं होतं.ती खूप भावनिक झाल्यासारखी दिसत होती. तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू तरळत होते.