Uddhav Thackeray Thane Speech : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरे बुंधूंची काल रविवारी शिवाजी पार्कात तोफ धडाडली.आज शिवाजी पार्कात महायुतीची महासभा सुरु असतानाच उद्धव ठाकरेंनी ठाण्यात विरोधकांच समाचार घेतला. ठाकरे म्हणाले,"उमेदवारांना ऑफर होती. त्यांनी नकार दिला. नाहीतर कोटी कोटी रुपये घेतल्यावर आपल्याला काय कळलं असतं. पण त्यांनी नकार दिल्यानंतर आपण काय करतोय?हा प्रश्न आहे.सोशल मीडिया सगळीकडे पसरला आहे. इन्स्टाग्रामवर रील फिरत आहेत. घराघरात पैशांची पाकिटं जात आहेत. आता निवडणूक संपली आहे. नेमणुका सुरु झाल्या आहेत. आम्हाला किंवा तुम्हाला वाटत असेल की आपण मतदान करतोय म्हणजे तुमचं सरकार निवडतोय? पण मला असं वाटतंय की कदाचित ही शेवटची निवडणूक असेल. यापुढे देशाचे पंतप्रधान देश चालवतील असं वाटत नाही. राज्याचे मुख्यमंत्री राज्य चालवतील असं वाटत नाही. देश कोण चालवेल? राज्य कोण चालवेल? आपण बसा बोंबलत महापौर कोण होणार? मला एक गोष्ट कळत नाही..आम्ही दोन भाऊ वीस वर्षांनी एकत्र आलो.जेव्हा एकत्र नव्हतो, तेव्हा विचारत होते एकत्र येणार की नाही येणार..आमची युती जागावाटपासाठी झालेलीच नाही. मराठी माणूस जागा करण्यासाठी आमची युती झाली आहे".
"इतर भाषिकांचं आमचं काहीच म्हणणं नाही"
उद्धव ठाकरे म्हणाले, "जागावाटप कसलं आमचीच जागा आहे. आम्ही एका घराण्याचीच लेकरं आहोत. आम्ही एका मातेची एका मातीची लेकरं आहोत. मग तुम्ही मराठी मराठी करताय? मग इतर भाषिकांचं काय?इतर भाषिकांनी काय तुमच्याकडे तक्रार केली आहे का? आमचा विरोध दुसऱ्या भाषिकांना किंवा भाषेला नाही. पण आमच्या घरात घुसून जो आमच्यावर दादागिरी करतोय,त्याला त्याच भाषेत उत्तर नाय दिलं तर कशाला छत्रपतींचं नाव घ्यायचं. आम्ही सहनशील आहोत. आम्ही सगळ्यांना मानत आलो. आपलं मानता मानता जे कोणी आपल्याशी दादागिरी करतात,त्यांना थोडसं कानफटलं तर काय चुकलं आमचं.इतर भाषिकांचं आमचं काहीच म्हणणं नाहीय".
नक्की वाचा >> "विकला जाणारा मी महाराष्ट्र सैनिक नाही, माझी पत्नी..",राज ठाकरेंच्या सभेआधीच ठाण्यात खळबळ! Video
"मराठी आमची आई आहे, हिंदी.."
"मराठी आमची आई आहे. हिंदी आमची मावशी आहे. या गद्दारांबरोबत मुंबईचा आणखी एक गद्दार गेलाय,तो बोलला होता मुंबई माझी आई आहे. हिंदी माझी मावशी आहे. आई (मुंबई) मेली तरी चालेल..आईवरती वार करणारी औलाद..म्हणजे एवढी गद्दार लोकं..आई तर पाहिजेच. मावशी,काकी,मामीही असूद्या.मोहन भागवत सांगतात कुटुंब वाढवा, मोठं कुटुंब वाढवा की..आम्ही कुठे नाही म्हणतोय. मोठं कुटुंब सुखी कुटुंब..त्यात नोकरी किती जणांना लावणार हे भागवतांनी सांगावं. का हिंदूस्थानात नुसती बेरोजगारांची फौज तयार करणार? जो माणूस शिवसेनेशी गद्दारी करतो, तोच आता ठाण्याशी गद्दारी करायला लागलाय. तोच आता ठाणेकरांशी गद्दारी करतोय..",असं म्हणत उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्षपणे टीका केली.