राज्यघटनेला 75 वर्ष पूर्ण होत असल्याबद््दल राज्यसभेत झालेल्या चर्चेला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी (17 डिसेंबर) उत्तर दिलं. या चर्चेच्या दरम्यान केंद्रीय गृहमंत्र्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्यावर राजकारण तापलंय. अमित शाह यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील केंद्रीय गृहमंत्र्यांवर टीका केलाय. अमित शाहांवर टीका करत असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही प्रश्न विचारला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भाजपाचा बुरखा फाडला
'अमित शाह यांनी ज्या पद्धतीनं महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेत अपमान केला त्यामुळे भाजपाचा बुरखा फाटला आहे. आंबेडकरांना कोणत्याही पक्षाची सीमा लागू होत नाही. ज्यांनी आम्हाला संविधान दिलं, त्यांचा अपमान आम्हाला मंजूर नाही. भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं या विषयावर भूमिका स्पष्ट करावी. त्यांनी अमित शाहांवर काय कारवाई करणार हे सांगावं,' असं वक्तव्य ठाकरे यांनी केलं.
पंतप्रधान मोदी अमित शाहांवर काही कारवाई करणार का? की, मोदींनीच अमित शाहांना हे सांगण्याची सूचना केली होती? असा सवाल ठाकरे यांनी विचारला तोडा-फोडा आणि राज्य करा हेच भाजपाचं हिंदु्त्व आहे, असा टोला ठाकरे यांनी केला. नेहरु-नेहरु करता-करता हे आता आंबेडकरांवर बोलायला लागले आहेत, इतकी यांची हिंमत वाढलीय, असं ते म्हणाले.
( नक्की वाचा : PM Modi Speech : 'काँग्रेसनं वेळोवेळी संविधानाची शिकार केली', पंतप्रधानांनी सर्व इतिहासच सांगितला )
भारतीय जनता पार्टीचे नेते, मित्रपक्ष आता काय भूमिका घेणार? हा माझा प्रश्न आहे. एनडीएमधील नितीशकुमार, चंद्राबाबू नायडू काय करणार? महाराष्ट्रातील त्यांचे मित्रपक्ष असलेले रामदास आठवले काय करणार? आठवले केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देणार का? असा सवालही ठाकरे यांनी विचारला.
अमित शाह काय म्हणाले होते?
अमित शाह यांनी मंगळवारी संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल झालेल्या चर्चेला राज्यसभेत संबोधित केले. त्यावेळी शाह म्हणाले की, 'बीआर आंबेडकरांचं नाव घेणं आता एक फॅशन झाली आहे. ही आता फॅशन झालीय. आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर... इतकं नाव जर देवाचं घेतलं असतं तर सात जन्म स्वर्ग मिळेल.