मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी विधानसभेतील भाषणात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सत्तारुढ बाकावर येण्याची ऑफर दिली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या जवळीकतेवरील चर्चा सुरु झाली होती. ही चर्चा सुरु असतानाच उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाले ठाकरे?
विधीमंडळ अधिवेशनाचा आज (18 जुलै) शेवटचा दिवस होता. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. विधीमंडळाच्या आवारात झालेल्या हाणामारीवरही त्यांनी टीका केली. त्याचवेळी त्यांना पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या ऑफरवर प्रश्न विचारला. त्यावर 'यह अंदर की बात है', असं सूचक उत्तर ठाकरे यांनी दिलं.
( नक्की वाचा : Devendra Fadnavis : आधी ऑफर, नंतर भेट, अखेर फडणवीसांना उद्धव ठाकरेंकडून काय हवंय? )
मुख्यमंत्री काय म्हणाले होते?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी विधान परिषदेमध्ये केलेल्या भाषणात उद्धव ठाकरेंना ऑफर दिली होती. फडणवीस यांनी ही ऑफर देताना म्हंटलं की, '2029 पर्यंत आम्हाला विरोधी बाकावर येण्याचा स्कोप नाही. तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप आहे.' फडणवीस यांनी भर सभागृहात ही ऑफर दिल्यानं नवी चर्चा सुरु झाली. विशेष बाब म्हणजे मुख्यमंत्र्यांच्यानंतर उद्धव ठाकरेचं सभागृहात भाषण झालं. त्या भाषणात ठाकरे यांनी या वक्तव्यावर काहीही बोलणं टाळलं होतं.
ही ऑफर ताजी असतानाच गुरुवारी उद्धव आणि फडणवीस यांच्या भेटीने या चर्चांना आणखी बळ दिले.