Uddhav Thackeray: 'तुम्हाला कोण ओळखतं, तुमची लायकी तर...', ठाकरेंनी दुबेंना शिवसेना स्टाईल ठोकलं

त्यामुळे त्याचा उल्लेख ठाकरेंनी लकडभग्गा असा करत जशात तसे उत्तर दिले आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी विरोधात गरळ ओकळी आहे. मराठीबाबत त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. शिवाय त्यांनी ठाकरेंनाही थेट आव्हान दिलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचा समचार उद्धव ठाकरे यांनी खास ठाकरे शैलीत घेतला आहे. शिवाय दुबे यांना मराठी इंगा ही दाखवला आहे. या निशिकांत दुबेंना कोण ओळखतं? हा कोण लकडबग्ग? लगडबग्ग म्हणजे जो धड लांडगा ही नसतो ना धड कुत्राही नसतो. त्यामुळे त्याचा उल्लेख ठाकरेंनी लकडभग्गा असा करत जशात तसे उत्तर दिले आहे. त्या ही पुढे जावून ते म्हणाले की त्यांना लकडबग्गा म्हणण्याचीही त्यांची लायकी नाही अशा तिखट शब्दात त्यांनी दुबेना ठोकले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

"तुमच्यात हिंम्मत आहे तर उर्दू भाषिकांनाही मारा, तेलुगू, तमिळ लोकांनाही मारा. मी नेहमी म्हटलं की आपल्या घरात तुम्ही नेहमी मोठे बॉस असता. या एकदा बिहार, उत्तर प्रदेशला, तमिळनाडू. आपटून आपटून मारू. असं वक्तव्य निशिकांत दुबे यांनी केलं. शिवाय आमच्या पैशांवर तुम्ही जगताय. तुम्ही कोणता टॅक्स आणताय ? असे अकलेचे तारेही याच निशिकांच दुबे यांनी तोडले होते. त्याचा चांगलाच समाचार उद्धव ठाकरे यांनी केला. निशिकांत दुबे कोण?  त्यांना कोण ओळखतं? ते सध्या आग लावण्याचे काम करत आहेत. तुम्ही तुमचं काम करा अशा शब्दात त्यांनी दुबेंना आरसा दाखवला आहे. शिवाय त्यांचा उल्लेख त्यांनी तरस असा उल्लेख केला.  

ट्रेंडिंग बातमी - Nishikant Dubey: "आमच्या पैशांवर तुम्ही जगताय', हिंदी वादावरुन भाजप खासदार बरळले, थेट ठाकरेंना आव्हान!

मनसैनिकांनी मराठी भाषा येत नाही म्हणून उत्तर भारतीय व्यापाऱ्याला फटकावलं होतं. त्यावरून भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी त्यांची तुलना पहलगाम इथल्या दहशतवाद्यां बरोबर केली होती. त्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या. इथं भाषा विचारून मारहाण केली असं ते म्हणाले होते. याचाही समाचार उद्धव ठाकरे यांनी घेतला. जे लोक मराठीसाठी आंदोलन करत आहे त्यांची तुलना पहेलगाम इथल्या दहशतवाद्या बरोबर केली जाते. ही तुलना करणारेच खरे मराठीचे मारेकरी आहेत. अशी तुलना करताना त्यांना लाज वाटली पाहीजे. पहलगामचे अतिरेकी कुठे गेले भाजपमध्ये गेले का असा प्रश्न ही उद्धव यांनी केला. हिंदूंचं रक्षण करू शकत नाही. मराठीचा अपमान करणाऱ्यांची बाजू घेता असे कर्मदरिद्री लोक राज्य करत आहेत अशी टीका ही त्यांनी यावेळी केली. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Maharashtra Assembly Session 2025: झिरवळांनी शिवसेनेच्या आमदाराला बनवलं 'मंत्री', विधानसभेत नेमकं काय घडलं?

आपण आणि राज ठाकरे एकत्र आल्यामुळे या सर्वांच्या बुडाला आग लागणं स्वाभाविक आहे. भाजपचं राजकारण तोडा फोडा आणि राज्य करा असं आहे. लोकांच्या घरांच्या होळ्या पेटवायच्या आणि आपल्या राजकारणाच्या पोळ्या भाजायच्या हा त्यांचा धंदा आता संपला आहे असं उद्धव या निमित्ताने म्हणाले. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावरही टीका केली. ठाकरे बंधुंच्या कार्यक्रमाला त्यांनी रुदाली म्हटलं होतं. यावर बोलताना उद्धव म्हणाले की फडणवीसांची मानसीकता आपण समजू शकतो. आता मुळ भाजप मेली आहे. त्याचा खून या लोकांनीच केला आहे. त्यामुळे त्याचंचं सध्या रुदाली सुरू आहे. त्यासाठी त्यांनी भाडेकरून उरबडवे घेतले असल्याची टीकाही उद्धव यांनी यावेळी केली. 

Advertisement