Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे निवडणुकीच्या मैदानात? विधान परिषदेवर जाण्यासाठी कसोटी लागणार

राज्यसभेच्या सात जागांपैकी संख्याबळानुसार मविआला केवळ एकच जागा मिळणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वत: निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. मविआच्या सरकार वेळी उद्धव ठाकरे हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते. त्यावेळी त्यांनी विधान परिषदेची निवडणूक लढवली होती. त्यानंतर ते विधान परिषदेवर गेले होते. आता त्यांच्या विधान परिषदेच्या सदस्यत्वाची मुदत 13 मे 2026 रोजी संपत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा एकदा विधान परिषदेवर जाणार का हा प्रश्न निर्माण झाला आहे. तसा निर्णय उद्धव यांनी जरी घेतला तरी निवडून जाण्यासाठी संख्याबळाची समस्या त्यांच्या समोर असणार आहे. 
     
विधान परिषदेच्या जवळपास 9 जागा या मे महिन्यात रिक्त होणार आहेत. त्यात उद्धव ठाकरे ही आहेत. या जागा विधान सभेतून विधान परिषदेसाठी निवडल्या जाणार आहेत. अशा वेळी विधान परिषदेत मविआचा केवळ एकच उमेदवार निवडून येवू शकतो. त्यामुळे अशा स्थितीत मविआचा उमेदवार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरे स्वत: निवृत्त होत असल्याने ते विधान परिषदेवर जाणार का हा खरा प्रश्न आहे. पण जरी त्यांनी तसा निर्णय घेतला तर मग त्यांना राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसला पाठिंबा द्यावा लागणार आहे. तसे झाल्यास उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जावू शकतात.   

नक्की वाचा - Kalyan News : जेलमध्ये असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकांसह त्यांच्या मुलांना मोठा धक्का

अशा स्थितीत संख्याबळाच्या कमतरतेमुळे मवीआची कोंडी होवू शकते.  उद्धव ठाकरेंना परिषदेवर जायचं झाल्यास राज्यसभेचं समीकरण जुळवावं लागेल. उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ 13 मे 2026 मध्ये संपणार आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे पुन्हा परिषदेवर येणार का याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र संख्याबळाच्या कमतरतेमुळे त्यांच्या समोर आव्हान असणार आहे. येत्या मे महिन्यात 9 जागा रिक्त होणार आहेत. मात्र विधान परिषदेच्या आधी सात जागांसाठी राज्यसभा निवडणूक होणार आहे. ही निवडणूक आधी पार पडल्यास विधान परिषदेचे समीकरण बदलू शकते असं बोललं जात आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Solapur News: सोलापुरात हायहोल्टेज ड्रामा! ढाब्यावर आढळल्या ईव्हीएम मशीन; राष्ट्रवादीचे नेते संतापले

राज्यसभेच्या सात जागांपैकी संख्याबळानुसार मविआला केवळ एकच जागा मिळणार आहे.  जर मविआमध्ये राज्यसभेची एक जागा एका पक्षाला तर परिषदेची एक जागा दुसऱ्या पक्षाला द्यावी लागेल. विधान परिषदेच्या 9 जागांपैकी मविआला एकच जागा मिळणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे 20 विधानसभा सदस्य आहेत. ठाकरेंनी राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेस वा शरद पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, तर ठाकरे विधान परिषदेत जाणार असा त्याचा अर्थ असू शकतो. मविआतील पक्षांना राज्यसभा आणि विधान परिषदेसाठी तडजोड करावी लागणार आहे.