'महाराष्ट्राचं पाणी काय असतं ते शिवसेना दाखवेल'

अब्दालींच्या दिल्लीतील खेचराना पाण्यात उद्धव ठाकरे दिसतो. महाराष्ट्राने तुम्हाला अजून पाणी पाजले नाही. महाराष्ट्राचं पाणी काय असंत हे शिवसेना दाखवून देईल असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी भाजप नेतृत्वाला दिला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

महाराष्ट्राने भाजपला पराभव काय असतो तो दाखवला आहे. अब्दालींच्या दिल्लीतील खेचराना पाण्यात उद्धव ठाकरे दिसतो. महाराष्ट्राने तुम्हाला अजून पाणी पाजले नाही. महाराष्ट्राचं पाणी काय असंत हे शिवसेना दाखवून देईल असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी भाजप नेतृत्वाला दिला आहे. सध्या अब्दालीचे चाळे सुळे आहेत. जे महाराष्ट्राला लुटायला येतील त्यांना महाराष्ट्र लुटू देणार नाही. असे सांगत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही जोरदार टिका केली. हे सरकार नुसते घोषणाबाजी करत आहे. घोषणा करून निवडणुका जिंकता येणार नाही असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. एकनाश शिंदेंना त्यांनी मांडूळही उपमा दिली. पंधरा लाख देणार होते ते पंधराशे कसे देतात. बाकीचे पैसे कुठे गेले असा प्रश्नही त्यांनी केला. शिवाय तीन महिने थांबा ज्यांनी चुकीचे केले आहेत त्यांना जेलमध्ये टाकल्या शिवाय राहाणार नाही असेही ते म्हणाले. 

संजय राऊत यांचा ही हल्लाबोल

सध्या ठाण्यातील लोकं फार सिनेमा काढत आहेत.  हे मुख्यमंत्री आहेत की फिल्म प्रोड्यूसर झालेत? मलाही सिनेमा काढायचा आहे. नमकहराम 2 हा सिनेमा मला काढायचाय. माझ्याकडं स्क्रीप्ट तयार आहे. अमिताभ-राजेश खन्ना यांचा एक नमकहारम आला होता. नमक हराम 2 चा स्क्रिप्ट तयार आहे.  असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला. विधानसभा निवडणुकीपूर्वी ठाण्यात शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. त्यामध्ये ते बोलत होते. ठाण्याचं नाव या गद्दारांनी मातीत मिळवलं आहे. या ठाण्यात अनेक महान लोकं होऊन गेली. बाळासाहेब ठाकरेंनतर ठाणे हे कडवट, निष्ठावान आनंद दिघेंच्या नावानं ओळखलं जात होतं. ते या गद्दारांनी नमकहरामांनी संपूर्ण देशात बदनाम केलं आहे. 

Advertisement

कार्यक्रमा आधी राडा 

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा आज ठाण्यात मेळावा होता. त्या मेळाव्याला ते येणार होते. ते ज्यावेळी मेळाव्यासाठी गडकरी रंगायतन इथे पोहोचले, त्याच वेळी मनसैनिकांनी एकच गोंधळ केला. उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर शेणाचे गोळे फेकण्यात आले. त्यानंतर बांगड्याही फेकण्यात आल्या. काही जणांनी दगड फेकण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांना त्यावेळी रोखले. यावेळी गडकरी रंगायतन बाहेर जोरदार गोंधळ झाला. पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड ही केली. 

Advertisement

Advertisement
Topics mentioned in this article