महायुतीचा उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच केंद्रीय गृहमंत्र्यांचा रत्नागिरीत प्रचार दौरा 

उमेदवार अद्याप जाहीर झाला नसला तरी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 24 एप्रिलला रत्नागिरी शहरात येणार आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
रत्नागिरी:

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. परंतू पण महायुतीमार्फत भाजपने प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. उमेदवार अद्याप जाहीर झाला नसला तरी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 24 एप्रिलला रत्नागिरी शहरात येणार आहेत. एका भव्य पटांगणावर अमित शाह रत्नागिरीकरांशी संवाद साधणार असल्याची माहिती भाजपा नेते तथा बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

महाविकास आघाडीतून विनायक राऊत यांना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र अद्याप महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही. नारायण राणे या जागेवरुन आग्रही आहेत. मात्र शिंदे गटाकडून उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत इच्छूक आहेत. त्यामुळे महायुतीतील  रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. दरम्यान अमित शाह यांच्या प्रचार दौऱ्यानंतर ही जागा भाजपकडे जाण्याची शक्यता वाढली आहे.  

Advertisement

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीचाच उमेदवार 100 टक्के विजयी होणार असा आम्हाला आत्मविश्वास आहे. उमेदवार कोणत्या पक्षाचा असेल हे केंद्रीय कोअर कमिटी निश्चित करेल. अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाईल असेही चव्हाण यांनी सांगितले. उमेदवारी जाहीर करण्याचे अधिकार महायुतीच्या नेत्यांना आहे. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचे सर्व कार्यकर्ते प्रचाराला लागले आहेत. केंद्रीय नेत्यांच्या प्रचारसभा आम्ही रत्नागिरीत मागून घेतल्या आहेत. त्यानुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 24 एप्रिलला रत्नागिरी शहरात प्रचारसभेला येणार आहेत. सभेची वेळ व ठिकाण निश्चित करण्याचे काम भाजपचे जिल्हा पातळीवरील नेते करत आहेत. परंतु या सभेला रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यातून महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतील. याच दिवशी महायुती उमेदवाराचा विजय निश्चित झालेला सर्वांना पाहायला मिळेल असंही चव्हाण यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या जाहीरनाम्यातील ठळक गोष्टींचा उल्लेख पत्रकार परिषदेत केला.
 

Advertisement