Operation Sindoor : केंद्रीय मंत्र्यांनी केला उद्धव ठाकरेंना फोन ! दोन्ही नेत्यांमध्ये काय झाली चर्चा?

मोदी सरकारमधील मंत्र्यांनी थेट उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

ऑपरेशन सिंदूर' च्या माध्यमातून पाकिस्तानी दहशतवादी आणि लष्कराचे कंबरडे भारतानं मोडले. त्यानंतर जगभर पाकिस्तानचा बुरखा फाडण्यासाठी मोदी सरकारनं नवी रणनीती आखली आहे. त्यानुसार सर्वपक्षीय शिष्टमंडळ वेगवेगळ्या देशांचा दौरा करणार आहेत. पहलगाममधील दहशतवादी हल्ला (Pahalgam Terror Attack) आणि ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) या सर्व प्रकरणात भारताची बाजू मांडतील. या शिष्टमंडळावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर मोदी सरकारमधील मंत्र्यांनी थेट उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना फोन लावला.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय झाली चर्चा?

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी या विषयावर उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. दहशतवादाविरोधात विविध देशांना भेट देणाऱ्या भारतीय शिष्टमंडळासंदर्भात ही चर्चा झाली. हे शिष्टमंडळ राजकारणाशी संबंधित नसून केवळ दहशतवादाविरोधातील भारताच्या लढ्यासाठी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, आपण देशाला आवश्यक ते सहकार्य करू असे आश्वासन शिवसेनेने दिले आहे.

उद्धव ठाकरे पक्षाच्या खासदर प्रियंका चतुर्वेदी या शिष्टमंडळाच्या सदस्य आहेत. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर, सर्वच राजकीय पक्षांनी पंतप्रधानांना दहशतवादाविरोधात, विशेषतः पाकिस्तानस्थित दहशतवादाविरोधात लढण्यासाठी पाठिंबा दर्शविला आहे.

( नक्की वाचा : 'आंतरराष्ट्रीय प्रश्नांमध्ये स्थानिक राजकारण नको,' शरद पवारांनी संजय राऊत यांना फटकारले )
 

देशात आम्ही गुप्तचर यंत्रणेतील त्रुटींबद्दल आणि पहलगाममधील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न विचारत राहू, पण जागतिक स्तरावर पाकिस्तानस्थित दहशतवादाला उघड करून त्याला एकटे पाडणे आणि नष्ट करणे आवश्यक आहे, असे विरोधी पक्षांनी म्हंटले आहे.

Advertisement

या कार्यात आम्ही एकत्र आहोत, परंतु अशा शिष्टमंडळांबद्दल पक्षांना अधिक चांगली माहिती दिली जावी, अशी सूचनाही केंद्र सरकारला करण्यात आली आहे.पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली पहलगाम ते ऑपरेशन सिंदूर या विषयावर सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणीही ठाकरे यांच्या शिवसेनेनं केली आहे. 

Advertisement

( नक्की वाचा :  PM मोदींनी थरुर आणि ओवैसींची निवड का केली? पाकिस्तानचा बुरखा फाडण्याचा काय आहे प्लॅन? )

काय म्हणाले होते राऊत?

यापूर्वी संजय राऊत यांनी इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी केंद्र सरकारनं  केंद्र सरकारने विविध देशांमध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळे पाठवण्याच्या निर्णयावर बहिष्कार घालावा, असं आवाहन केलं होतं. ही शिष्टमंडळं सरकारची पापं आणि गुन्हे यांचं समर्थन करतील, असा दावा राऊत यांनी केला होता. 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या विषयावर राऊत यांना फटकारलं. भारताच्या जागतिक स्तरावरील प्रयत्नांमध्ये 'स्थानिक पातळीवरील राजकारण' आणू नये, असा सल्ला त्यांनी दिला.
 

Advertisement
Topics mentioned in this article