'उबाठा' खासदाराने ठाकरेंसमोरच केलं शिंदेचं कौतुक!'मातोश्री' वरील बैठकीत पक्षातील असंतोषाचा स्फोट!

Shivsena UBT MP : विशेष म्हणजे एका खासदाराने तर चक्क उद्धव ठाकरे यांच्यासमोरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले.

जाहिरात
Read Time: 3 mins
Shivsena UBT MP : मातोश्रीवरील बैठकीत खासदारांनी अनेक गौप्यस्फोट केले.
नवी दिल्ली:

रामराजे शिंदे, प्रतिनिधी

Shivsena UBT MP : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षातील अंतर्गत धुसफूस मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे समोर येत आहे.  मुंबईतील मातोश्रीपर्यंत झालेल्या बैठकांमध्ये खासदारांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे एका खासदाराने तर चक्क उद्धव ठाकरे यांच्यासमोरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पक्षाकडून साधी मदतही मिळत नसल्याची खंत या बैठकीत व्यक्त करण्यात आली असून, यामुळे आगामी काळात पक्षापुढील अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

एकनाथ शिंदेंकडून 20 कोटी रुपयांची मदत

उद्धव ठाकरेंचे मुंबईतील निवास्थान असलेल्या मातोश्रीवर पार पडलेल्या बैठकीत एका खासदाराने अत्यंत धाडसी वक्तव्य करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आपल्याच पक्षाने आपल्याला वारंवार डावलले असून संकटाच्या काळात पक्षाने कोणतीही मदत केली नाही, असा आरोप या खासदाराने केला. 

Advertisement

धक्कादायक बाब म्हणजे, आपण ठाकरेंच्या पक्षात असूनही एकनाथ शिंदे यांनी आपल्याला 20 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला, अशी कबुली या खासदाराने दिली. कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी आणि विकासकामे करण्यासाठी निधीची गरज असताना पक्षाने पाठ फिरवली, मात्र शिंदेंनी सढळ हाताने मदत केल्याचे या खासदाराने बैठकीत ठासून सांगितले.

( नक्की वाचा : Ajit Pawar : राहुल गांधींची भेट आणि कर्नाटकमध्ये FIR! रोहित पवारांच्या खेळीवर मुख्यमंत्र्यांचं थेट उत्तर )

निवडणूक लढवणार नसल्याची खासदाराची घोषणा

दुसरीकडे दिल्लीत संजय राऊत यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीतही नाराजीचा सूर उमटला. एका खासदाराने तर थेट 2029 ची निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर करून टाकले. उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत आमचे म्हणणे पोहोचत नाही आणि नेत्यांशी संपर्कच नसेल तर पक्ष पुढे कसा जाणार, असा सवाल या खासदाराने उपस्थित केला. 

निवडणुकीत कोणतीही आर्थिक मदत मिळाली नसल्याने आता यापुढे पक्ष सांभाळणे कठीण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावर संजय राऊत यांनीही चिंता व्यक्त करत अनिल देसाईंना उद्देशून म्हटले की, हे खासदार काय म्हणत आहेत ते पहा आणि उद्धव साहेबांना याची कल्पना द्या.

( नक्की वाचा : Uddhav Thackeray: 'उद्धवजींच्या स्वभावात राजकारण कमी, कलाकार जास्त'; चक्क फडणवीसांनी केलं भरभरुन कौतुक! )

माजी आमदारांच्या गळतीमुळे चिंतेचे वातावरण

पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या संवादाच्या अभावामुळे केवळ खासदारच नव्हे तर माजी आमदारही पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती तिसऱ्या एका खासदाराने दिली. आपल्या पक्षाचे एक माजी आमदार लवकरच दुसऱ्या गटात सामील होत असल्याचे सांगताना या खासदाराने नेतृत्वावर ताशेरे ओढले. 

Advertisement

कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी पैसे लागतात आणि पक्षाकडून अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही. अशा स्थितीत मी त्यांना कोणत्या आधारावर थांबवू, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. उद्धवजी, तुम्हालाच आता या आमदारांशी थेट बोलावे लागेल, अशी मागणी या खासदाराने बैठकीत 

स्क्रीप्टनुसार झालेली मातोश्रीवरील चर्चा

मिळालेल्या माहितीनुसार, मातोश्रीवर होणाऱ्या बैठकीत काय बोलायचे याची 'स्क्रीप्ट' आधीच दिल्लीतील बैठकीत ठरवण्यात आली होती. खासदारांनी एकमेकांशी चर्चा करून आपल्या मागण्या आणि नाराजी मांडण्याचे निश्चित केले होते. कार्यकर्त्यांना मदत मिळाली नाही तर पक्ष टिकणार कसा, हा कळीचा मुद्दा या बैठकीत वारंवार चर्चिला गेला. 

Advertisement

आगामी काळात जर ही नाराजी दूर झाली नाही, तर उबाठा गटाला मोठ्या गळतीचा सामना करावा लागू शकतो, असे संकेत या बैठकीतून मिळत आहेत. 

Topics mentioned in this article