गोंदिया विधानसभेत कमळ फुलणार? दोन अग्रवाल एकमेकांना भिडणार?

गोंदिया शहर आणि ग्रामीण भाग मिळून गोंदिया विधानसभा मतदार संघ तयार झालेला आहे. काँग्रेसच्या गोपालदास अग्रवाल यांनी या मतदार संघाचे सर्वाधिक वेळा प्रतिनिधीत्व केले.

जाहिरात
Read Time: 3 mins
गोंदिया:

महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरचा जिल्हा म्हणजे गोंदिया. हा जिल्हा आदिवासी बहुल म्हणूनही ओळखला जातो. गोंदिया शहर आणि ग्रामीण भाग मिळून गोंदिया विधानसभा मतदार संघ तयार झालेला आहे. काँग्रेसच्या गोपालदास अग्रवाल यांनी या मतदार संघाचे सर्वाधिक वेळा प्रतिनिधीत्व केले. मात्र मागिल निवडणुकीत गोपालदास अग्रवाल यांनी काँग्रेसची साथ सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना भाजपने उमेदवारीही दिली. पण मतदारांनी त्यांना साथ दिली नाही. गोपालदास अग्रवाल यांचा पराभव झाला. अपक्ष असलेले विनोद अग्रवाल हे विजयी झाले. ते मुळचे भाजपचेच आहेत. उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी करत निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. यावेळीही हे दोन्ही अग्रवाल रिंगणात असण्याची शक्यता आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

गोपालदास अग्रवाल हे मागिल निवडणुकीत पराभूत झाले होते. तर अपक्ष म्हणून निवडून आलेले विनोद अग्रवाल हे सध्या भाजप बरोबर आहेत. त्यामुळे भाजपकडून त्यांना उमेदवारी मिळेल अशी शक्यता आहे. असं झाल्यास गोपाल अग्रवाल काय करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गोपालदास अग्रवाल यांनी निवडणुकीच्या तयारीली सुरूवात केली आहे. त्यांना उमेदवारी मिळेल असा विश्वास आहे. जर मिळाली नाही तर गोपालदास अग्रवाल पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशीही चर्चा सध्या मतदार संघात आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदार संघातून भाजप उमेदवाराला मताधिक्य मिळालं होतं. त्यामुळे भाजपकडून उमेदवारी मिळवण्याचा या दोनही अग्रवाल यांचा प्रयत्न आहे.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - हर्षवर्धन पाटील लढणार की माघार घेणार? इंदापूर विधानसभा कोणाच्या पारड्यात?

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अनेक जण या मतदार संघातून इच्छुक आहेत. त्यांनी तयारीही सुरू केली आहे. भाजपकडून गोपालदास अग्रवाल पुन्हा निवडणूक लढण्यास इच्छुक आहे.त्या पाठोपाठ पंकज रहांडाले  महायुतीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून इच्छुक आहेत. शिवाय राजेंद्र जैन आणि केतन तुरकर यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. भाजप नेते रमेश कुथे यांनी नुकताच भाजपला राम राम केला. त्यानंतर त्यांनी शिवसेना ठाकरे गटा प्रवेश केला. त्यांनीही या मतदार संघावर दावा केला आहे. महाविकास आघाडी कडून निवडणूक लढण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली आहे. त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सौरभ रोकडे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. तर  काँग्रेसकडून अमर वराडे निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत.       

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - केज मतदार संघात भाजपची डोकेदुखी वाढणार? राखीव मतदार संघात कोण बाजी मारणार?

1995 पासून या ठिकाणी भाजपचा आमदार निवडून आलेला नाही. सलग तीनदा गोपालदास अग्रवाल काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आले आहेत. हा मतदार संघ काँग्रेसचा गड राहीला आहे. सध्या गोपालदास अग्रवाल भाजपवासी आहेत. या मतदार संघात विनोद अग्रवाल अपक्ष आमदार आहेत. ते ही भाजपचे समर्थक आहे. गोंदिया शहर आणि ग्रामीण असा हा मतदार संघ आहे. जातीय समीकरणाचा विचार करता इथं सिंधी ,मारवाडी, गुजराती समाजाचे प्राबल्य आहे. त्या बरोबर  तेली, कुणबी व पवार समाजही मोठ्या प्रमाणात आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदार संघाने भाजप उमेदवाराला मताधिक्य दिले होते. जवळपास 30 हजाराचे मताधिक्य भाजप उमेदवाराला होते. त्यामुळे विधानसभेतही तोच कल ठेवण्याचे आव्हान भाजप समोर असेल.  

Advertisement