मुख्यमंत्री कोण होणार? यावरून महाविकास आघाडीत खटके उडताना दिसत आहेत. कधी शिवसेना ठाकरे गट या पदावर दावा करत आहे तर कधी काँग्रेस नेते मुख्यमंत्री काँग्रेसचाच होणार असे सांगत आहेत. दुसरीकडे शरद पवारांनी थांबा आणि पाहा ही भूमीका घेत, मुख्यमंत्रिपदाबाबत राष्ट्रवादीची भूमीका गुलदस्त्यात ठेवली आहे. त्यात आता काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारां पैकी एक बाळासाहेब थोरात यांनी मोठं विधान केलं आहे. हे विधान मुख्यमंत्रिपदाबाबत आहे. एकीकडे निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण याचा निर्णय घेण्याचे ठरले असताना, दुसरीकडे थोरातांनी मात्र मुख्यमंत्रिपदाबाबत जाहीर पणे वक्तव्य केले आहे. त्यामुळे आघाडीत बिघाडी होते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभेची जोरदार तयारी सुरू झाली आहे. सध्या जागा वाटपाची चर्चा महाविकास आघाडी बरोबरच महायुतीमध्येही सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. जास्तीत जास्त जागा आपल्या पदरा पाडून घेण्याची त्यांची रणनिती आहे. त्यातून जास्त जागा जिंकत मुख्यमंत्रिपद पटकावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यात काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट आघाडीवर दिसत आहे. त्यातून दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून आलटून पालटून मुख्यमंत्रिपदावर दावा केला जात आहे.
ट्रेंडिंग बातमी - 'लाडक्या बहिणी'चा रात्रभर बँके बाहेर मुक्काम, नंदुरबारमध्ये काय घडलं?
मुख्यमंत्री कोण असावा याचा निर्णय विधानसभा निवडणूक निकालानंतर करू असं महाविकास आघाडीचं ठरलं होतं. शिवाय निवडणुकी आधी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नको यावरही आता एकमत झाले आहे. असे असताना काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पुढचा मुख्यमंत्री कोण असेल याबाबत जाहीर वक्तव्य केले आहे. भाईंदरमधील काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. पुढचा मुख्यमंत्री हा काँग्रेसचाच होणार असं विधान केलं आहे. त्यामुळे काँग्रेसने पुन्हा एका मुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे.
ट्रेंडिंग बातमी - कोविड XEC ने टेन्शन वाढवलं, 27 देशांमध्ये फैलाव; काय आहेत लक्षणे?
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही काही दिवसापूर्वी मुख्यमंत्रिपदाबाबत स्पष्ट भूमीका मांडली होती. निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेवू असे शरद पवार म्हणाले होते. राष्ट्रवादीत मुख्यमंत्रिपदासाठी कोणी इच्छुक नाही असेही सांगितले होते. शिवाय उद्धव ठाकरे यांनीही मुख्यमंत्रिपदाचं तेव्हा ही, आताही स्वप्न नव्हतं असं वक्तव्य करत मुख्यमंत्रिपदाबाबतच्या चर्चेला पूर्ण विराम दिला होता. शिवाय शिर्डीतल्या सभेत ज्या वेळी नाना पटोले आले होते त्यावेळी पुढाचा बॅट्समन आला असे सुचक वक्तव्य केले होते.
महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा सध्या सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हा आघाडीत मोठा पक्ष ठरला होता. त्यामुळे विधानसभेला जास्त जागा मिळाव्यात ही काँग्रेसची भावना आहे. त्यासाठी काँग्रेस आक्रमकही आहे. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटही जास्त जागा पदरात पाडून घेण्याच्या प्रयत्नात आहे. शरद पवारांनीही आपली रणनिती आखली आहे. जिंकणाऱ्या जागांवर त्यांचा डोळा आहे. येत्या काही दिवसात हे जागा वाटप निश्चित होणार आहे. त्यानंतर आघाडीत मोठा भाऊ कोण हे स्पष्ट होणार आहे.