लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील घराण्यांनी आपला करिष्मा पुन्हा एकदा दाखवून दिला. माढा लोकसभा मतदार संघातून धैर्यशिल मोहिते पाटील यांनी भाजपच्या रणजित सिह नाईक निंबाळकर यांचा जवळपास एक लाखा पेक्षा जास्त मतांनी पराभव केला. शिवाय सोलापूर लोकसभा मतदार संघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्या विजयातही हातभार लावला. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यावर आपले अजूनही वर्चस्व आहे हे मोहिते पाटील यांनी दाखवून दिले आहे. आता विधानसभेच्या तयारीला मोहिते-पाटील लागले आहेत. त्यामुळेच खासदार सुप्रिया सुळे यांनी विधानसभेत मोहित पाटील यांना फ्रि हँड देण्याचे संकेतच दिले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा सध्या सोलापूर जिल्ह्यात आहे. त्यावेळी त्या बोलत होत्या.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सोलापूर जिल्ह्यातील अनेक जण अजूनही अजित पवारांबरोबर आहे. पण त्यांना आता घरवापसीचे वेध लागले आहेत. त्यांनी तशी मोर्चे बांधणीही केली आहे. विधानसभेची उमेदवारी राशप कडून मिळेल की नाही याची चाचपणीही ते करत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात उमेदवारी देताना विजयसिंह मोहिते पाटील यांची भूमिका मोठी असणार आहे.
ट्रेंडिंग बातमी - सरकारचा मोठा निर्णय, नगराध्यक्षांचा कालावधी वाढवला, आता अडीच वर्षा ऐवजी...
जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी विधानसभा निवडणुकीच्या तिकिटाच्या मागण्या झाल्या आहे. मात्र सोलापूर जिल्ह्यात विधानसभेची उमेदवारी देण्यासाठी शरद पवार, जयंत पाटील हे विजयसिंह मोहिते पाटील यांचे मार्गदर्शन घेऊनच तिकीट जाहीर करतील. असे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात आता मोहिते पाटील पॅटर्न दिसून येईल. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात एकेकाळी मोहिते पाटलांचा दबदबा होता.तोच मोहिते पाटलांचा दबदबा येत्या निवडणुकीतही पाहायला मिळणार आहे.
मोहिते पाटील आणि सोलापूर असे एक समिकरण आहे. मोहित पाटील यांनी या जिल्ह्यात आपला दबदबा अजूनही कायम ठेवला आहे. शिवाय त्यांनी लोकसभेत आपली ताकद ही दाखवून दिली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत इच्छुकांना मोहिते पाटील यांची मर्जी सांभाळावी लागणार आहे. मोहिते पाटील पाठीशी असतील तर विजय निश्चित असे त्यांना वाटत आहे. त्यात आता सर्व अधिकार हे मोहित पाटील यांना दिले गेले तर त्यांच्या मर्जीतीलच उमेदवार सोलापुरात दिसतील असे मानले जात आहे.