जाहिरात

राणांनंतर शिंदेंनी केली अडचण, म्हणाले... 'लाडकी बहीण' योजनेतून तुमची नावं डिलिट करणार'

महायुतीच्या नेत्यांकडूनच लाडकी बहीण योजने बाबत अशी काही वक्तव्य आली आहेत, ज्यामुळे महायुतीच्याच अडचणी वाढणार आहेत.

राणांनंतर शिंदेंनी केली अडचण, म्हणाले... 'लाडकी बहीण' योजनेतून तुमची नावं डिलिट करणार'
सातारा:

लडकी बहीण योजनेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. महायुती सरकारकडून या योजनेची मोठी प्रसिद्धी केली जात आहे. बहीणीसाठी सरकारची ही भाऊबीज असल्याचे सांगितले जात आहे. शिवाय ही योजना गेमचेंजर असल्याचे स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगत आहेत. तर दुसरीकडे विरोधकांनी या योजनेवरून सरकारवर टिकेची झोड उठवली आहे. ही योजना निवडणुकीच्या तोंडावर आणली आहे. पुढे ती बंद ही केली जाईल असे विरोधकांकडून सांगितले जात आहे. अशात आता महायुतीच्या नेत्यांकडूनच लाडकी बहीण योजने बाबत अशी काही वक्तव्य आली आहेत, ज्यामुळे महायुतीच्याच अडचणी वाढणार आहेत. आधी आमदार रवी राण यांनी वक्तव्य केले. त्यावरून वाद मिटत नाही तोच शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी लाडकी बहीण योजने बाबत वक्तव्य करत नव्या वादाला तोंड फोडले आहे. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

शिंदेंचे आमदार काय म्हणाले? 

लाडकी बहीण योजना ही सरकारची महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेच्या जोरावर पुन्हा सत्तेत येण्याची रणनिती महायुतीने आखली आहे. असे असताना साताऱ्यातील कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे. महेश शिंदे हे सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या वक्तव्याची पडसाद संपुर्ण महाराष्ट्रात उमटले आहेत. लाडकी बहीण योजेनवरुन बोलताना त्यांनी मतदारसंघातल्या विरोधकांना थेट दमच दिलाय. निवडणुकीनंतर छाननी केली जाणार आहे. छाननी समितीची बैठक आहे. त्या बैठकीनंतर लाडकी बहीण योजनेतून तुमची नावं डिलीट करण्यात येतील असं वक्तव्य आमदार महेश शिंदेंनी केलय. त्यामुळे विरोधकांच्या हातात शिंदेंनी आयतेच कोलीत दिले आहे.  

ट्रेंडिंग बातमी - सरकारचा मोठा निर्णय, नगराध्यक्षांचा कालावधी वाढवला, आता अडीच वर्षा ऐवजी...

निवडणुकीनंतर अर्ज बाद करणार

महेश शिंदे हे एका सभेमध्ये बोलताना म्हणाले की, एका व्हॉट्सअॅपच्या ग्रुपवर पडलं होतं की. मुख्यमंत्रीसाहेब, तुमची लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये आम्हाला नकोत. आम्हाला आरक्षण द्या. त्यावर मी त्याला फोन करून विचारलं की, तुला आरक्षण दिलं आहे. अजून काय पाहिजे? तुझ्या घरच्यांनी अर्ज केलाय का? त्यावर तो बोलला की अर्ज केलाय. त्यानंतर मी म्हणालो, तो अर्ज मी बाद करतो. निवडणूक झाल्यानंतर छाननी होईल आणि कोण पात्र आणि कोण अपात्र हे ठरेल. शिंदे पुढे म्हणाले की, तुमच्या आमदाराला तुम्ही ओळखता. गावागावातील कोपऱ्या-कोपऱ्यात कोण राहतंय हे माहिती आहे. या इलेक्शनमध्ये पुढे पुढे करणाऱ्यांची नावं काढा, आपण त्यांचा करेक्ट कार्यक्रम डिसेंबरमध्ये करणार. त्यांच्या यावक्तव्याने राजकीय वर्तूळात एकच खळबळ उडाली आहे. 

ट्रेंडिंग बातमी - भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी महिलेची नियुक्ती? RSS-भाजपच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?

रवी राणाही बोलून गेले 

आमदार शिंदे यांत्या आधी महायुतीचे रवी राणा यांनीही असेच काहीसे वक्तव्य करत आपल्याच सरकारला अडचणीत आणले आहे.  आमचं सरकार आलं तर लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपयांची रक्कम 3 हजार रुपये करू. त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. ज्यांनी मला आशीर्वाद दिला नाही, त्यांच्या खात्यातून 1500 रुपये परत घेणार, असा दम रवी राणा यांनी उपस्थित महिलांना दिला.  ज्याचं खाल्लं त्याचं जागलं पाहिजे. सरकार देत राहते पण सरकारला आशीर्वादही दिला पाहिजे, असं रवी राणा म्हणाले. त्यांच्या हे वक्तव्य सध्या सोशल मीडियवार जोरदार व्हायरल होत आहे. त्यामुळे सरकारची कोडीं झाली आहे. 

ट्रेंडिंग बातमी - मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? महाविकास आघाडीत घमासान, वाद पेटणार?

फडणवीसांना करावी लागली सारवासारव 

या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यामुळे सरकार पुढे पेच निर्माण झाला होता. यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीसांना पुढे यावं लागले.   कोणी तरी लोकप्रतिनिधींनी सांगितलं  पैसे दिल्यानंतर आम्ही परत घेऊ, तर हे असं अजिबात होणार नाही. हे सर्व पैसे तुमच्या अकाऊंटला येणार आहेत. त्यामुळे ते कुणीही घेऊ शकत नाही. तुम्ही ते पाहिजे तेंव्हा काढू शकता, खर्च करु शकता' असं स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिलं आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना 1500 रुपये मिळणार मात्र काही लोकांच्या पोटात हे दुखत आहे. आमच्या बहिणीच्या संसाराला आमचाही थोडाफार हातभार लागला पाहिजे म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली आहे असे ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - 'सुनेत्रा पवारांना बहिणीविरुद्ध उभं केलं ही चूक', अजित पवारांची मोठी कबुली

जयंत पाटलांची टीका

आमदार महेश शिंदे यांनी केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारनं ही योजना आणल्याचं जयंत पाटील म्हणाले. निवडणुकीनंतर 10 लाखांचे अर्ज लाखावर आणण्याचा यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे. राण आणि शिंदे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध खासदार सुप्रिया सुळे यांनीही केला आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
मविआत पुढचा मुख्यमंत्री कोणाचा? काँग्रेसच्या जेष्ठ नेत्याने थेट सांगितलं, आघाडीत बिघाडी होणार?
राणांनंतर शिंदेंनी केली अडचण, म्हणाले... 'लाडकी बहीण' योजनेतून तुमची नावं डिलिट करणार'
bjp-aims-for-125-seats-in-upcoming-assembly election 2024 vidhan-sabha-election
Next Article
अबकी बार सव्वाशे पार!विधानसभा निवडणुकीत 125 जागा जिंकण्याचे भाजपचे लक्ष्य