VP Election 2025 : 'त्या' फोननंतर शरद पवारांनी भूमिका केली स्पष्ट, NDA ला पाठिंबा न देण्याचं सांगितलं कारण

VP Election 2025 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) चे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Sharad Pawar : शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका स्पष्ट केली.
मुंबई:

VP Election 2025 : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. पुढील महिन्यात होणाऱ्या या निवडणुकीत सत्तारुढ राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि विरोधी पक्षांच्या इंडी आघाडीनं उमेदवार जाहीर केले आहेत. 

एनडीएचे उमेदवार  सी. पी. राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) चे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला आहे.

शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत सांगितलं की, 'शरद पवार यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. तर उद्धव ठाकरे यांनी अद्याप कोणताही स्पष्ट प्रतिसाद दिलेला नाही. 

"मी उद्धव ठाकरेजी आणि शरद पवारजी यांच्याशी बोललो आणि त्यांना उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या (सी.पी. राधाकृष्णन) उमेदवारीला पाठिंबा देण्याची विनंती केली. उद्धवजींनी मला सांगितले की ते चर्चा करून मला कळवतील. शरद पवारजी म्हणाले की त्यांना विरोधी पक्षाने उभे केलेल्या उमेदवारासोबत जावे लागेल," असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

शरद पवारांनी सांगितलं कारण

मुख्यमंत्र्यांनी फोन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (22 ऑगस्ट 2025) शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली. ' सीपी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. महाराष्ट्रातील मतदार आहेत. त्यामुळे त्यांना पाठिंबा द्यावा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं होतं, असं पवार यांनी सांगितलं.

Advertisement

सीपी राधाकृष्णन हे आमच्या विचारांचे नाहीत. आम्ही विरोधी पक्षांच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. असं पवार यांनी स्पष्ट केले. राधाकृष्णन राज्यपाल असतानाच राजभवानातच झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांना अटक झाली होती. सत्तेचा गैरवापर यामध्ये उघड झाला होता, याची आठवण पवार यांनी करुन दिली. आम्हाला मतांची संख्या माहिती आहे. निर्णयाची चिंता नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

( नक्की वाचा : B.Sudarshan Reddy: सुदर्शन रेड्डी यांना विरोधकांनी उपराष्ट्रपतीचा उमेदवार का बनवले? वाचा संपूर्ण गेम प्लॅन )
 

किती आहे संख्याबळ?

शिवसेना (यूबीटी) चे लोकसभेत 9 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) चे 10 खासदार आहेत, तर दोन्ही पक्षांचे राज्यसभेत प्रत्येकी 2 सदस्य आहेत.

Advertisement

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीच्या मतदान मंडळात लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांचा समावेश असतो. संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे नामनिर्देशित सदस्यही मतदान करण्यास पात्र आहेत.

मतदान मंडळाची  सदस्य संख्या 781 आहे. तर बहुमताचा आकडा 391 आहे.