Who Is Abhijeet Dipke : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. दिल्लीच्या जंतर-मंतरवर तरुण पिढीने (Gen Z)आंदोलनाचं हत्यार उपसलं होतं. नीट पेपर फुटी प्रकरणावरून संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी भाजपचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आज अखेर प्रधान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे.
सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडल्यानंतर दिपके यांनी मात्र आंदोलन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. दिपके यांच्या लढ्याला यश मिळाल्याने सोशल मीडियावर सीजेपीची तुफान चर्चा रंगली आहे. अभिजीत दिपके नेमके आहेत तरी कोण?असाही प्रश्न अनेकांना पडला आहे.दिपके यांचं शिक्षण,करिअर आणि बॅकग्राऊंडबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
कोण आहेत अभिजित दिपके?
पत्रकारितेत पदवी :
अभिजित दिपकेने त्यांच्या करिअरची सुरुवात पत्रकारितेच्या शिक्षणापासून केली. त्यांनी पुण्यातील एका प्रसिद्ध संस्थेतून पत्रकारितेत पदवी मिळवली. अभिजित दिपके हे छत्रपती संभाजीनगरचे मूळ रहिवासी आहेत.
अमेरिकेतून मास्टर डिग्री : हायर एज्युकेशनसाठी ते परदेशात गेले आणि अमेरिकेच्या लोकप्रिय बॉस्टन यूनिव्हर्सिटीतून पब्लिक रिलेशन्समध्ये MSC डिग्री केली आहे. डिजिटल माध्यमातून स्ट्रॅटजिक कम्युनिकेशनच्या माध्यमातून जनभावना आणि लोकांच्या आकलनशक्तीला बदलण्याचे धडे गिरवले.
करिअर हायलाईट्स : आप (AAP) च्या 'मीम कॅम्पेन'चे मास्टरमाईंड
अभिजित दिपके फक्त कंटेन्ट क्रिएटर नाहीत,तर ते राजकीय चळवळींना पडद्यामागे सांभाळण्यात सक्षम असल्याचं सांगितलं जातं.वर्ष 2020 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी (AAP) च्या बंपर विजयामागे त्यांची मोठी भूमिकी होती.ते आपच्या यूथ सेंट्रिक डिजिटल मीडिया कॅम्पेनचे मुख्य रणनीतीकार होते. त्या निवडणुकीत त्यांच्याकडून 'मीम सुनामी'(Meme Avalanche) वर तरुणांना सोशल मीडियावर जोडण्यात मोठी भूमिका बजावली.
नक्की वाचा >> आजच्या तरुण पिढीला Gen Z का म्हणतात? 90 टक्के लोकांना माहितच नाही, यामागचं कारणही आहे खास
सरकारसोबत काम करण्याचा अनुभव
पॉलिटिकल कॅम्पेनिंगशिवाय अभिजित दिपके दिल्ली सरकारसोबतही खूप जवळून जोडले गेले आहेत. त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री कार्यालय (CMO) मध्ये 'कम्युनिकेशन फेलो' शिवाय काम केलं.त्यानंतर ते दिल्लीच्या शिक्षण विभागात कम्युनिकेशन एडव्हायझर म्हणूनही काम करत होते.
16 मे रोजी सुरु झाला प्रवास
अभिजित दिपकेनं याच वर्षी 16 मे रोजी कॉकरोच जनता पार्टी (CJP) प्लॅटफॉर्मची सुरुवात केली होती.बेरोजगारीच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या या पेजला लोकांचा खूप मोठा पाठिंबा मिळाला. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world