
official spokespersons of the NCP Sharad Pawar faction :राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने संघटनात्मक पातळीवर एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पक्षाने नुकतीच नव्या अधिकृत प्रवक्त्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत काही प्रमुख आणि चर्चेत असलेल्या नावांचा समावेश असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. या यादीमध्ये 15 नावांची (NCP Sharad Pawar's party spokespersons) घोषणा करण्यात आली आहे.
ही आहे यादी...
- विद्याताई चव्हाण
- अंकुश काकडे
- सुधाकर भालेराव
- भीमराव हत्तीअंबिरे
- महेश तपासे
- विकास लावंडे
- सक्षणा सलगर
- मेहबुब शेख
- फहाद अहमद
- राजा राजपुरकर
- मनाली भिलारे
- नितीन देशमुख
- क्लाइड क्रास्टो
- राखी जाधव
- रचना वैद्य
राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार पक्षाचे अधिकृत
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 12, 2025
प्रवक्ते म्हणून नेमणूक करण्यात येत आहे
1. Vidyatai chavan
2. Ankush Kakade
3. Sudhakar Bhalerao
4. Bhimroa Hattiambere
5. Mahesh Tapase
6. Vikas Lawande
7. Sakshana Salgar
8. Mehbub Shaikh
9. Fahad Ahmed
10. Raja Rajpurkar…
या यादीमधील अनेक नावांची चर्चा सुरू झाली आहे. या यादीतील फहाद अहमद या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. फहाद अहमद याने विधानसभा निवडणूक 2024 लढवली होती. फहाद अहमद याने अणुशक्तिनगर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. यात त्याला पराभव स्वीकारावा लागला होता. दरम्यान फहाद खान याच्या निवडीबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे.
नक्की वाचा - Cabinet Decision : रेशन दुकानदारांसाठी खूशखबर; मार्जिनच्या दरात प्रति क्विंटल 20 रुपयांची वाढ
कोण आहे फहाद अहमद? l (Who is Fahad Ahmed)
फहाद अहमद हा अभिनेत्री स्वरा भास्कर हिचा पती (Actress Swara Bhaskar's husband Fahad Ahmed) आहे. 16 फेब्रुवारी 2023 रोजी दोघेही लग्नबंधनात अडकले. अत्यंत साध्या पद्धतीने दोघांचा लग्नसमारंभ पार पडला. यानंतर 23 सप्टेंबर 2023 मध्ये त्यांना कन्यारत्नाचा लाभ झाला. 2024 मध्ये फहादने अणुशक्तिनगर येथून विधानसभा निवडणूक लढवली होती. त्याच्या विरोधात अणूशक्तिनगर येथून नवाब मलिक यांची कन्या सना खान हिने निवडणूक लढवली आणि जिंकलीही होती.

फहाद अहमद आधी समाजवादी पार्टी युवा शाखा समाजवादी युवाजन सभेचा महाराष्ट्रातील प्रमुख होता. फदाह अहमद उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील बहेडीचा राहणारा आहेत. स्वरा भास्करसोबत लग्न झाल्यानंतर फहादचं नाव चर्चेत आलं. यांचं लग्न 2023 मध्ये झालं. त्यांना रुबिया नावाची मुलगीही आहे. स्वरा भास्कर आणि फहाद यांची भेट नागरिकत्व कायदा आणि नागरिकत्व नोंदणीसंदर्भात झालेल्या आंदोलनात झाली होती. यानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये एमफिलचं शिक्षण घेत असतानाही फहादचं नाव वादात होतं.
त्यांनी संस्थेच्या अध्यक्षांकडून पदवी स्वीकारण्यास नकार दिला होता. फहाद तेव्हा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष होता. 2022 मध्ये फहादला समाजवादी पक्षाच्या युवा शाखेच्या समाजवादी युवा सभेचा महाराष्ट्र अध्यक्ष बनवण्यात आलं. फहादचे वडील देखील समाजवादी पक्षाचे नेते आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world