विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून एक आठवडा झाला. तरही राज्यात अजूनही सत्ता स्थापन झाली नाही. मुख्यमंत्री कोण होणार याचीही घोषणा झाली नाही. ही सर्व राजकीय धावपळ सुरू असताना काळजीवाहू मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी या सर्वापासून लांब राहात आपले दरेगाव गाठले आहे. ते सध्या आपल्या गावात आहेत. शिंदे नाराज आहेत का? अशी चर्चाही यानिमित्ताने होत आहे. शिवाय काही महत्वाच्या खात्यांसाठी शिंदे दबाव बनवत आहेत का असे ही बोलले जात आहे. अशा वेळी दरेगावातल्या लोकांचे मात्र थोडे वेगळे मत आहेत. त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सध्या एकनाथ शिंदे हे दरेगावात आहेत. या गावातल्या लोकांना एकनाथ शिंदे हे गरिबांचे मसिहा वाटतात. सध्या मुख्यमंत्री कोण होणार अशी चर्चा संपूर्ण राज्यात सुरू आहे. अशा वेळी दरेगावातील गावकऱ्यांना एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत असे वाटत आहे. त्यांनी अडीच वर्ष चांगलं काम केलं आहे. त्यांची ओळख ही गोरगरीबांचा नेता अशी झाली आहे. आम जनतेचा वाली ते झाले आहेत असे मत गावकऱ्यांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे पुन्हा तेच मुख्यमंत्री झाले पाहीजे अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
ट्रेंडिंग बातमी - 'EVM मध्ये घोटाळा, त्यामुळे महायुतीचा विजय' युतीतल्या माजी नेत्याचा खळबळजनक दावा
अनेक नेते हे मंत्री झाल्यावर स्वत:चं घर भरतात. पण एकनाथ शिंदे यांनी सर्व सामान्यांची घरं भरण्याचं काम केलं. गावात रस्ते केले. पायवाटा सुधारल्या. अनेक सुखसुविधा दिल्या असं गावकरी आवर्जून सांगतात. गेल्या 75 वर्षात जे कुणी दिलं नाही ते गेल्या अडीच वर्षात एकनाथ शिंदे यांनी दिलं. लाडक्या बहिण योजनेचा उल्लेख तर गावातल्या महिला आवर्जून करतात. त्यांच्या मते ही योजना चांगली आहे. या योजनेचे पैसे आधिक महिलांच्या खात्यात जमा झाले. तो आमच्यासाठी पगार आहे. त्याची किंमत श्रीमंताना समजणार नाही असंही महिला सांगतात. एकनाथ शिंदे यांना गोरगरिबांची जाण आहे असं महिला म्हणाल्या. त्यामुळे पुढचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावेत असं त्यांना वाटतं.
एकनाथ शिंदे हे दरे गावचे पुत्र आहेत. त्यामुळे त्यांच्या बरोबर आमचे वेगळे संबध आहेत. अशा वेळी शिंदेंनी गेल्या अडीच वर्षात राज्यासाठी भरीव काम केलं आहे. या पुर्वी असं कुणीच केलं नव्हतं ते शिंदेंनी करून दाखवलं आहे. सर्वांच्या कल्याणासाठी शिंदे झटले आहेत. त्यामुळे आमच्याच गावचा मुख्यमंत्री व्हावा अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. गावातले सर्व लोक हे शिंदेंच्या मागे आहेत. त्यामुळे आमचाच दादा पुन्हा मुख्यमंत्री होईल असा विश्वास गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.