जाहिरात

'EVM मध्ये घोटाळा, त्यामुळे महायुतीचा विजय' युतीतल्या माजी नेत्याचा खळबळजनक दावा

आता महायुतीचाचा भाग असलेले, मात्र त्यानंतर वेगळे लढलेल्या महादेव जानकर यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे.

'EVM मध्ये घोटाळा, त्यामुळे महायुतीचा विजय' युतीतल्या माजी नेत्याचा खळबळजनक दावा
नवी दिल्ली:

महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळाला. महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला. त्यानंतर आघाडीच्या नेत्यांनी ईव्हीएमवर खापर फोडलं आहे. ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला. लोकसभेच्या अगदी उलट निकाल कसा लागू शकतो. तो ही इतक्या मोठ्या प्रमाणात यामुळे मविआच्या नेत्यांनी या विजयाबाबत संशय व्यक्त केला आहे. पण आता महायुतीचाचा भाग असलेले, मात्र त्यानंतर वेगळे लढलेल्या महादेव जानकर यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. त्यांनीही ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. शिवाय आपण इंजिनिअर असल्यामुळे ईव्हीएम बरोबर काय होवू शकते याची कल्पना असल्याचं हीते म्हणाले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर हे महायुतीचा भाग होते. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये ते मंत्री ही होते. शिवाय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जानकर हे महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढले होते. पण विधानसभेला त्याचं भाजप बरोबर बिनसलं. त्यांनी स्वतंत्र उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले. विधानसभेला त्यांना यश मिळालं नाही. त्यांचा केवळ एक आमदार निवडून आला. गंगाखेड विधानसभा मतदार संघातून रत्नाकर गुट्टे विजयी झाले. विधानसभा निवडणुकीचा लागलेला निकाल हा धक्कादायक असल्याचं या निमित्ताने महादेव जानकर म्हणाले आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - मुख्यमंत्री शपथविधीची तारीख, ठिकाण, मुहूर्त ठरला? विलंबाचं कारणही आले समोर

 निवडणुकीत अनेक ठिकाणी EVM मध्यये घोटाळा झाल्याचा दावा जानकर यांनी केला आहे. हा घोटाळा झाल्यामुळेच महायुतीच्या जागा निवडून आल्याचं ही ते म्हणाले.  EVM वर माझा व पक्षाचा ही आक्षेप आहे असंही ते म्हणाले. देशभरात आम्ही याविरोधात आंदोलन करू असंही ते म्हणाले. EVM मुळे देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. शिवाय EVM हॅक करता येतं. मी स्वतः इंजिनिअर आहे. त्यामुळं मला सगळ माहीत आहे असं ही ते म्हणाले. सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग सगळे त्यांचे आहेत. त्यामुळं याला लोकशाही म्हणता येणार नाही. लोकशाहीचा खून करण्याचं काम झालं आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. 

ट्रेंडिंग बातमी -  "मुख्यमंत्रिपदासाठी माझ्या नावाची चर्चा निर्थरक आणि कपोलकल्पित"; मुरलीधर मोहोळांचं स्पष्टीकरण

महायुतीला एवढं बहुमत मिळालं आहे. त्यामुळं राज्याचा मुख्यमंत्री कोणाला करायचं हा भाजपचा प्रश्न आहे. येवढं बहुमत मिळूनही निर्णय होत नाही यावरही आपल्याला काही बोलायचं नाही असंही ते म्हणाले. शिवाय भाजप कोणाला सरप्राइज मुख्यमंत्री करेल यात मला आजिबात पडायचं नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. मला महायुतीचा अनुभव खूप वाईट आला आहे. त्यामुळं मी त्यांच्यातून बाहेर पडलो आहे. काँग्रेसला अजून अजमावलं नाही. त्यामुळं त्यांच्याकडे न जाता स्वतंत्र पुढे जायची आमची भूमिका आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

ट्रेंडिंग बातमी -  याला प्रेम म्हणावं? 4 वर्षांच्या मुलाला जाळणाऱ्या विकृताला होणार फाशी, आईने नाकारल्याने लेकराला शिक्षा

दरम्यान या विधानसभा निवडणुकीत माझ्या पक्षाचा सध्या एकच आमदार आहे. कोणासोबत जायचं याचा अजून निर्णय झालेला नाही. पण जर त्याने पक्षाला न विचारता काही निर्णय घेतला, तर त्यावर नक्की कारवाई करू असा इशारा महादेव जानकर यांनी दिला आहे. गंगाखेड मतदार संघातून रत्नाकर गुट्टे हे राष्ट्रीय समाज पक्षाच्या तिकीटावर निवडून आले आहेत. त्यांनाच जानकर यांनी हा इशारा दिला आहे. पक्ष हा आपल्याच ताब्यात आहे. त्यामुळे माझा एक आमदार असला तरी तो पक्षावर दावा सांगू शकत नाही असं ही त्यांनी सांगितलं. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com