मायावतींनी उत्तरप्रदेशाऐवजी नागपुरातून निवडणूक अभियानाची सुरुवात का केली?

देशभरात बसपा एकट्याने निवडणूक लढवत आहे. 2014 च्या धर्तीवर या निवडणुकीत मायावतींनी एकट्याने लढण्याचा निर्णय घेतला आहे. अशा स्थितीत अनेकवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या मायावतींनी उत्तर प्रदेश सोडून निवडणूक अभियानाची सुरुवात नागपुरातून का केली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
नागपूर:

बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी गुरुवारी सायंकाळी नागपुरमध्ये एका निवडणुकीच्या सभेला संबोधित केलं. नागपूरच्या इंदौराच्या बेजानबागमध्ये मायावती यांनी लोकसभा निवडणूक 2024 ची पहिली जनसभा घेतली होती. उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान आणि मध्य प्रदेश नंतर, महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जिथे कधीकाळी बसपाला पाठिंबा होता. मात्र अलीकडच्या काळात बसपा निवडणुकीच्या राजकारणात मागे पडताना दिसत आहे.

देशभरात बसपा एकट्याने निवडणूक लढवत आहे. 2014 च्या धर्तीवर या निवडणुकीत मायावतींनी एकट्याने लढण्याचा निर्णय घेतला आहे. अशा स्थितीत अनेकवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या मायावतींनी उत्तर प्रदेश सोडून निवडणूक अभियानाची सुरुवात नागपुरातून का केली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नागपुरातील सभेच्या माध्यमातून दलित मतदारांना मोठा संकेत
भारताच्या दलित राजकारणासाठी नागपूर हे  प्रमुख ठिकाण मानलं जातं. 14 ऑक्टोबर 1956 मध्ये नागपुरच्या दीक्षाभूमीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या 3 लाख 65 हजार समर्थकांसह बौद्ध धर्मात प्रवेश केला. या माध्यमातून त्यांनी अनेक पुस्तकं आणि लेख लिहून दलितांच्या समान हक्काचा मुद्दा उपस्थित केला. आंबेडकरांच्या सिद्धांतावरुनच कांशीराम यांनी बसपाला देशातील गावागावापर्यंत पोहोचवलं होतं. मायावती आणि बसपासाठी दलित मतपेटी आधार आहे. मात्र काळानुसार भाजपने त्या मतपेटीत मोठा खड्डा केला. त्यामुळे पुन्हा एकदा ती दलित वोट बँक मिळविण्यासाठी मायावतींकडून प्रयत्न सुरू करण्यात आला आहे?

हिंदुत्वाच्या राजकारणात आपल्या मूळ मतदारांना सांभाळण्याचा प्रयत्न...
नुकत्याच झालेल्या निवडणुकांनुसार, भाजपला मोठ्या प्रमाणात दलित मतदान मिळत आहे. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीतही दलितांचा मोठा वर्ग भाजपकडे झुकलेला दिसला. मायावती या संपूर्ण दलित समाजाऐवजी केवळ जाटव समाजाचे प्रतिनिधित्व करतात, असे मायावतींचे टीकाकार आणि विरोधक सांगतात. मात्र एक काळ असाही होता, जेव्हा न केवळ उत्तर प्रदेशात तर देशातील अनेक राज्यांमध्ये मायावती यांच्या घोषणावरुन दलित मतांचा मोठा वर्ग मतदान करीत होता. त्यामुळे मायावतींनी पुन्हा एकदा उत्तर प्रदेशातून बाहेर पडत राष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. 

Advertisement

1990 आणि 2000 च्या दशकात देशातील अनेक राज्यांमध्ये बहुजन समाज पक्षाचा विस्तार पाहायला मिळाला. उत्तर प्रदेशा व्यतिरिक्त, बसपाचे उमेदवार बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव टाकत आहेत. कांशीराम यांच्यानंतरही बसपाला मायावतींच्या नेतृत्वाखाली अनेक ठिकाणी चांगले यश मिळाले. परंतू 2014 मध्ये हिंदुत्वाच्या राजकारणाचा मोठ्या प्रमाणावर उदय झाल्यानंतर मायावती आणि बसपाला मोठा फटका बसल्याचं दिसून येत आहे.

गेल्या दहा वर्षांच्या राजकारणावर नजर टाकली तर भाजप आणि इतर पक्षांचा कल वाढत चालला आहे. अनेक निवडणूक सभांमध्येही पंतप्रधान मोदींनी आंबेडकरांना आदर न दिल्याने काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. आम आदमी पार्टीही दिल्ली आणि पंजाबमध्ये आंबेडकरांना पुढे करून राजकारण करताना दिसत आहे. अशा स्थितीत आंबेडकरांच्या राजकीय वारशावर आपला दावा बळकट करण्यासाठी मायावती पुन्हा एकदा नागपुरात पोहोचल्या.

Advertisement


 

Topics mentioned in this article