शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला आहे. जो निर्णय मोदी आणि शाह घेतली तो आपल्याला मान्य असेल असं सांगत शिंदे यांनी आपल्या तलवारी म्यान केल्या आहेत. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर चार दिवस शिंदे यांनी कोणतीही प्रतिक्रीया दिली नव्हती. पडद्यामागे काही तरी घडामोडी घडत होत्या. मुख्यमंत्रिपद मिळावे यासाठी ते प्रयत्नशिल होते. पण त्यात त्यांना यश आलं नाही. शेवटी त्यांनी भाजपच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे. यावरून आता काँग्रेसने शिंदे यांना चिमटे काढले आहेत. शिवाय काही प्रश्नही उपस्थित केले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महायुतीला ऐवढं मोठं बहुमत मिळाल्यानंतरही गेले चार दिवस मुख्यमंत्री कोण यावरच चर्चा सुरू होती. त्यावर तोडगा निघत नव्हता. शेवटी एकनाथ शिंदे यांनी भूमीका स्पष्ट करत मुख्यमंत्रिपदाबाबत सर्वाधिकारहे भाजपच्या श्रेष्ठींना दिले. यावरू काँग्रेसने काही प्रश्न उपस्थित केले आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर वरून दबाव आला असेल. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असावा असा युक्तीवाद काँग्रेसने केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, एकनाथ शिंदे इतके दिवस का गप्प होते, ते का बोलले नाहीत असा प्रश्नही केला आहे.
ट्रेंडिंग बातमी - शिंदेंनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडला, मोदी- शाहांचा निर्णय मान्य करणार
या मागचे कारण म्हणजे युतीमध्ये काही तरी घोळ दिसत असल्याचंही ते म्हणाले. पाशवी बहुमत मिळाल्यानंतरही सत्तास्थापनेचा घोळ सुरू आहे. हा घोळ संशयास्पद असल्याचंही पटोले म्हणाले. महाराष्ट्राला गॅसवर ठेवण्याचं महायुतीकडून सुरू आहे. हे गोष्ट निषेध करण्यासारखी आहे असंही ते म्हणाले. दरम्यान जे चेहरे मुख्यमंत्री म्हणून समोर येत आहेत त्यापैकीच कोणी होणार का या बाबत शंका आहे. की आणखी कुणी नवा चेहरा पुढे येतो हे पहावं लागेल असंही ते म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - ठाकरे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडणार? पराभूत उमेदवारांच्या बैठकीत काय घडलं?
गेल्या काही निवडणुकीत भाजपने धक्कातंत्राचा वापर केला आहे. प्रस्थापित मुख्यमंत्र्यांना त्यांनी हटवत नव्या नेतृत्वाच्या हातात सत्ता दिली आहे. त्यामुळे तसं ही काही महाराष्ट्रात होईल की काय याबाबत पटोले म्हणाले. भापजमध्ये जे चेहरे मुख्यमंत्रिपदासाठी पुढे येतात ते नंतर गायब होतात असं ही ते म्हणाले. एकंदरीत मात्र त्यांनी महायुतीच्या सध्या सुरू असलेल्या घोळाबाबत जोरदार टीका केली आहे.