जाहिरात

ठाकरे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडणार? पराभूत उमेदवारांच्या बैठकीत काय घडलं?

उद्धव ठाकरेंनी मित्रपक्षांबाबत काय निर्णय घ्यायचा हे नंतर ठरवू असं म्हटल्याची माहितीही सूत्रांकडून मिळत आहे. मात्र काँग्रेसकडूनही ठाकरे गटाने मदत न केल्याचा आरोप होत आहे. 

ठाकरे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडणार? पराभूत उमेदवारांच्या बैठकीत काय घडलं?

राहुल कुलकर्णी, पुणे

विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाने पराभवाची कारणे शोधण्यसाठी पराभूत उमेदवारांची बैठक बोलावली होती. यामध्ये पराभूत उमेदवारांनी पराभवाची कारणे देताना ईव्हीएमवर सर्वात आधी खापर फोडलं. त्यानंतर मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी आपली कामे केली नसल्याचा आरोप अनेकांनी केला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

त्यामुळे महाविकास आघाडीतून बाहेर पडा, अशी मागणी बहुतांश उमेदवारांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यावर उद्धव ठाकरेंनी मित्रपक्षांबाबत काय निर्णय घ्यायचा हे नंतर ठरवू असं म्हटल्याची माहितीही सूत्रांकडून मिळत आहे. मात्र काँग्रेसकडूनही ठाकरे गटाने मदत न केल्याचा आरोप होत आहे. 

( नक्की वाचा :  'राज्यात बिहार फॉर्म्युला नाही', शिंदेंना नाही तर फडवीसांनी मुख्यमंत्री करा, आठवलेंनी सांगितलं कारण )

ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून महायुतीतून बाहेर पडण्याची मागणी होत असली तातडीने असं काही लगेचच घडेल याची शक्यता फार कमी आहे. कारण विधिमंडळात महाविकास आघाडीची ताकद कमी आहे. त्यामुळे तिथे त्यांना एकत्रित काम करावं लागणार आहे. आदित्य ठाकरे यांना विरोधी पक्षनेता बनवण्याच्या हालचाली सुरु झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना विरोधी पक्षनेता बनवायचं असेत ठाकरे गटाला काँग्रेस आणि शरद पवार गटाची साथ लागणार आहे.

( नक्की वाचा :  Maharashtra Election Result 2024 : विधानसभा निवडणुकीत मुस्लीम मतदारांचा परिणाम किती झाला? )

याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील तोंडावर आहेत. मुंबई आणि ठाणे महापालिका निवडणुका ठाकरे गटासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे तातडीने याबाबत काही घडेल याची शक्यता फार कमी आहे. मात्र याबाबतची भावना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये देखील आहे, अशी चर्चा सुरु आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या पक्षांमधील अंतर वाढलं आहे हे नेत्यांच्या वक्तव्यांतूनही स्पष्ट आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com