जाहिरात

CCTV VIDEO: कॅमेऱ्यासमोर 16 वर्षांच्या बास्केटबॉल प्लेयरचा शेवटचा जम्प, राष्ट्रीय खेळाडूचा मैदानातच मृत्यू

Hardik Rathi Death: बास्केटबॉल खेळताना झालेल्या एका हृदयद्रावक दुर्घटनेत एका राष्ट्रीय स्तरावरच्या खेळाडूचा मृत्यू झाला आहे.

CCTV VIDEO: कॅमेऱ्यासमोर 16 वर्षांच्या बास्केटबॉल प्लेयरचा शेवटचा जम्प, राष्ट्रीय खेळाडूचा मैदानातच मृत्यू
Hardik Rathi Death: बास्केटबॉल खेळताना मैदानातच हार्दिकचा मृत्यू झाला.
मुंबई:

Hardik Rathi Death: बास्केटबॉल खेळताना झालेल्या एका हृदयद्रावक दुर्घटनेत एका राष्ट्रीय स्तरावरच्या खेळाडूचा मृत्यू झाला आहे. हरियाणातील लखन माजरा येथील मैदानात सराव करत असताना हार्दिक राठी ( Hardik Rathi) या 16 वर्षांच्या खेळाडूच्या छातीवर बास्केटबॉलचा पोल कोसळला आणि या दुर्दैवी अपघातात त्याचा जीव गेला. हा पोल मैदानात नीट रोवलेला नव्हता आणि तो अचानक पुढे झुकून हार्दिकवर पडला. त्याचे मित्र त्वरित मदतीला धावले, त्यांनी पोल बाजूला केला, पण गंभीर जखमी झालेल्या हार्दिकला वाचवता आले नाही.

अपघाताचे CCTV फुटेज

या अपघाताचे CCTV फुटेज अत्यंत वेदनादायक आहे. फुटेजमध्ये हार्दिक मैदानात एकटा सराव करताना दिसतो. तो थ्री पॉईंट लाईनहून ( three-point line) धावत येऊन बास्केटला हात लावण्याचा (scoring ability सुधारण्याचा) सराव करत होता. हार्दिकने पहिली maneuver सहज पूर्ण केली. दुसऱ्या प्रयत्नात, त्याने बास्केटच्या रिमला पकडताच, पोल त्याच्यावर कोसळला. बोर्डसह पोलचे संपूर्ण वजन त्याच्या छातीवर पडले. जवळपास असलेले त्याचे मित्र आणि इतर खेळाडू त्वरित धावले आणि त्यांनी हार्दिकला बाहेर काढले, पण तोपर्यंत खूप मोठा अपघात झाला होता. 16 वर्षांचा हा उदयोन्मुख खेळाडू यात गंभीर जखमी होऊन मरण पावला.

( नक्की वाचा : Pune News : खराडी, हडपसर, स्वारगेट ते खडकवासला... पुण्यातील नवा भाग मेट्रोनं जोडणार, वाचा A to Z माहिती )
 

हार्दिकच्या शेजाऱ्यांनी सांगितले की, त्याची राष्ट्रीय टीममध्ये (National Team) निवड झाली होती आणि तो नुकताच ट्रेनिंग कॅम्पमधून परतला होता. त्याचे वडील संदीप राठी यांनी हार्दिक आणि  त्याच्या लहान भावाला घराजवळील एका स्पोर्ट्स क्लबमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी दाखल केले होते. या घटनेनंतर पोलिसांनी हार्दिकचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमनंत कुटुंबीयांकडे सोपवला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इथे पाहा VIDEO

यापूर्वीही झाला होता अपघात

याच पद्धतीने हरियाणाच्या बहादुरगढ जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी अशीच एक धक्कादायक घटना घडली होती. अमन नावाचा 15 वर्षांचा खेळाडू एका स्टेडियममध्ये सराव करत असताना बास्केटबॉलचा पोल त्याच्यावर पडला. अमला अंतर्गत गंभीर दुखापती झाल्या आणि रोहतकमधील हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अमनचे कुटुंबीय त्यांच्या मुलाला PGIMS मध्ये योग्य उपचार मिळाले नाहीत, असा आरोप करत आहेत. अमन 10 वी मध्ये शिकत होता आणि त्याने नुकतेच शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेत पदक जिंकले होते.


एकापाठोपाठ झालेल्या या दोन उदयोन्मुख  बास्केटबॉल खेळाडूंच्या मृत्यूमुळे हरियाणातील सार्वजनिक क्रीडा सुविधा आणि त्यांच्या देखभालीच्या (maintenance) दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हरियाणा हे देशातील अनेक उत्कृष्ट खेळाडूंचे माहेरघर आहे, पण अशा घटनांमुळे खेळाडू आणि त्यांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com