Suryakumar Yadav: "सूर्यकुमार यादव मला मेसेज करायचा!" अभिनेत्रीच्या दाव्याने खळबळ; चर्चांना उधाण

Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवने कोणत्याही वादाला उत्तर न देता अध्यात्माचा मार्ग निवडला आहे. सूर्याने आपली पत्नी देविशा शेट्टी हिच्यासह आंध्र प्रदेशातील तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर स्वामींचे दर्शन घेतले.

जाहिरात
Read Time: 2 mins

भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या त्याच्या खेळापेक्षा अभिनेत्री खुशी मुखर्जीने केलेल्या एका दाव्यामुळे चर्चेत आला आहे. 'किड्डान एंटरटेनमेंट'ने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये खुशीने सांगितले की, "मला कोणत्याही क्रिकेटरला डेट करायचे नाही. अनेक क्रिकेटपटू माझ्या मागे आहेत. सूर्यकुमार यादव मला खूप मेसेज करायचा. आता आमचे बोलणे होत नाही आणि मला त्याच्याशी नाव जोडले जावे असेही वाटत नाही."

खुशी मुखर्जीचे स्पष्टीकरण

बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर खुशीने काही माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, त्यांच्यात कोणताही रोमँटिक संबंध नव्हता. त्यांच्यात केवळ मैत्रीपूर्ण संवाद होता, जो एका पराभवानंतर सूर्याने चर्चा करण्यासाठी केला होता. तिच्या शब्दांचा विपर्यास केला गेल्याचा आरोपही तिने केला आहे.

पाहा VIDEO

सूर्यकुमार यादव पत्नीसह तिरुपतीच्या दर्शनाला

या वादाच्या दरम्यान, सूर्यकुमार यादवने कोणत्याही वादाला उत्तर न देता अध्यात्माचा मार्ग निवडला आहे. सूर्याने आपली पत्नी देविशा शेट्टी हिच्यासह आंध्र प्रदेशातील तिरुमला येथील श्री व्यंकटेश्वर स्वामींचे दर्शन घेतले. पारंपरिक वेशभूषेत या दांपत्याने वैकुंठ द्वारातून दर्शन घेतले आणि देवाचा आशीर्वाद घेतला.

Advertisement

सूर्यकुमार यादव आता लवकरच मैदानावर परतणार आहे. 2024 च्या टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ सज्ज असून त्यापूर्वी न्यूझीलंडविरुद्धची मालिका महत्त्वाची आहे.

  • न्यूझीलंड विरुद्ध टी-20 मालिका: जानेवारी 2026 (5 सामने)
  • टी-20 विश्वचषक 2026: 7 फेब्रुवारीपासून सुरुवात (भारत आणि श्रीलंका यजमान)

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत सूर्याला अपेक्षित फॉर्म मिळवता आला नव्हता, त्यामुळे आगामी न्यूझीलंड मालिकेत तो पुन्हा लय मिळवेल अशी चाहत्यांना आशा आहे.

Topics mentioned in this article