T20 World Cup दरम्यान व्हायरल होणारी ही सुंदरी कोण? AI की...; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

T20 World Cup Viral Girl: सामना सुरू होता, कॅमेरा फिरत होता आणि अचानक एका चेहऱ्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला.

जाहिरात
Read Time: 2 mins

Virtual Influencer Trend: Virtual Influencer Trend: आयसीसी टुर्नामेंटच्या उत्साहादरम्यान अनेकदा स्टेडिअममधील एखादा क्षण कॅमेऱ्यात कैद होतो. ICC Men's T20 World Cup विश्वचषक स्पर्धेदरम्यान एक मुलगी तुफान व्हायरल होत आहे. भारत विरुद्ध अमेरिका सामन्यादरम्यान आयरा रावत नावाच्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि पांढऱ्या स्कर्टमध्ये आयरा कॅमेऱ्यासमोर पाहून स्मितहास्य देत होती. काही वेळातच तिचे इंस्टाग्राम फॉलोअर्स ३,००० वरून वाढून लाखोंमध्ये झाले.


अनेकांनी उपस्थित केले सवाल...(AIra Rawat viral girl)

आयरा रावत हिच्या सौंदर्याने चाहत्यांमध्ये भुरळ पडली आहे. मात्र काही जणांकडून संशय व्यक्त केला जात आहे. काही युजर्सना तिचे फोटो अपेक्षेपेक्षा जास्त परफेक्ट वाटले. तिचा बेदाग चेहरा, लायटिंग, फ्रेमिंगबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. काही जणांनी हा फोटो AI generated असल्याचं म्हटलं आहे. 

AI influencer काय असतं?

AI influencer एक व्हर्चुअल पर्सनॅलिटी असते. ही व्यक्ती आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि 3D डिजाइनमधून तयार केली जाते. ही व्यक्ती सोशल मीडियावर सक्रिय असते. ब्रँड प्रमोशन करते आणि लाखो फॉलोअर्स कमावते. या ट्रेंडचा प्रसिद्ध उदाहरण म्हणजे Lil Miquela. २०१६ मध्ये एका स्टार्टअपने अशा प्रकारचं कॅरेक्टर तयार केलं होतं. या कॅरेक्टरने अनेक ग्लोबल ब्रँडसोबत काम केलं आणि मिलियन फॉलोअर्स मिळवते. 

Advertisement

नक्की वाचा - Ind vs Pak Match: 'पाकिस्तानबरोबर क्रिकेट सामना नकोच' इस्लाम पार्टीचे वक्तव्य चर्चेत, कारण ही सांगितले


आयराचं सत्य काय? 

आयरा सावतच्या प्रकरणात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र काही एआय डिटेक्शन टूल्सने या फोटोंवर संशय व्यक्त केला आहे. सोशल मिडिया आणि एआयच्या जगात खरं आणि खोट्यामधील फरक जाणून घेणं कठीण झालं आहे. त्यामुळे फॉलो करण्यापूर्वी सत्य जाणून घेणं आवश्यक आहे.