Smriti Mandhana : स्मृती मानधनाच्या सांगतीलीत घरात लग्नाची तयारी सुरू होती. क्रिकेटर स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांच्या संगीतमधील नृत्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. देशाच्या लेकीचं लग्न असल्याने सर्वांनाच या लग्नाची उत्सुकता होती. लग्नाच्या व्हिडिओमध्ये दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद दिसत होता. मात्र लग्नाच्या काही तासांपूर्वी स्मृती मानधनाच्या वडिलांची प्रकृती बिघडली आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आलं. वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. वडिलांची प्रकृती स्थिर होईपर्यंत लग्न पुढे ढकलण्यात आलं आहे.
वडिलांच्या हृदयविकारानंतर पलाशचीही प्रकृती बिघडली
वडिलांची प्रकृती स्थिर होत नाही तोपर्यंत लग्न करणार नसल्याचं स्मृतीने ठरवलं. दरम्यान वडिलांची प्रकृती बिघडल्याचं दु:ख असताना स्मृती मानधनाला आणखी एक धक्का बसला आहे. स्मृती मानधनाचा होणारा पती पलाश मुच्छल (Palash Muchhal's health) याचीही तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली आहे. त्याला अॅसिडिटीचा त्रास जाणवत होता. त्यामुळे त्याला अस्वस्थ वाटत होते. म्हणून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात उपचार घेऊन तो निघून गेल्याची माहिती आहे. (Palash Muchhal's health deteriorated)
नक्की वाचा - Big News : स्मृती मंधानाच्या लग्नात विघ्न! वडिलांना लग्नाच्या ठिकाणीच आला हृदयविकाराचा झटका
स्मृतीच्या मॅनेजरने दिली महत्त्वाची माहिती...
स्मृती मानधनाच्या मॅनेजरने मीडियाला माहिती देताना सांगितलं, सकाळी नाश्त्या दरम्यान स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांची तब्येत अचानक बिघडली. थोड्या वेळ वाट पाहिल्यानंतरही त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने तातडीने रुग्णवाहिका बोलावण्यात आली आणि वडिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांच्या विवाह सोहळ्याची संपूर्ण जगभरात चर्चा रंगली असतानाच लग्न पुढे ढकलल्याची दु:खद बातमी समोर आली आहे.