जाहिरात

Big News : स्मृती मंधानाच्या लग्नात विघ्न! वडिलांना लग्नाच्या ठिकाणीच आला हृदयविकाराचा झटका

Smriti Mandhana : स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांच्या विवाह सोहळ्याची संपूर्ण जगभरात चर्चा रंगली असतानाच अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे.

Big News : स्मृती मंधानाच्या लग्नात विघ्न! वडिलांना लग्नाच्या ठिकाणीच आला हृदयविकाराचा झटका
Smriti Mandhana And Palash Muchhal Wedding
मुंबई:

शरद सातपुते, प्रतिनिधी

Smriti Mandhana Breaking News : स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांच्या विवाह सोहळ्याची संपूर्ण जगभरात चर्चा रंगली असतानाच अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. समडोळी येथील मंधाना फार्महाऊसवर लग्नाची तयारी सुरू असताना स्मृती मंधानाचे वडील श्रीनिवास मंधाना यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. .सांगलीतल्या एका खाजगी रुग्णालयामध्ये स्मृतीच्या वडिलांवर उपचार सुरु आहेत. यावेळी स्मृती मंधाना आणि तिचे कुटुंबीय रुग्णालयात दाखल झाले आहेत. स्मृतीच्या वडिलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आलीय. स्मृती मंधाना आणि पलश मुच्छलच्या लग्नाचा सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.

लग्नाच्या ठिकाणी नेमकं काय घडलं?

सांगलीत स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांच्या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आज हा विवाह सोहळा थाटामाटात पार पडणार आहे. परंतु, स्मृती मंधानाच्या वडिलांना विवाहस्थळीच हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे स्मृती-पलशच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. या लग्न सोहळ्यासाठी  क्रीडा व विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्तिथ राहणार होते. परंतु, लग्नाच्या दिवशीच स्मृतीच्या वडिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आज सायंकाळी साडेचार वाजता लग्नाचा मुहूर्त होता.दरम्यान,लग्न स्थळाच्या ठिकाणावरून येणाऱ्या पाहुण्यांना परत पाठवलं जात आहे. 

नक्की वाचा >> Viral Video : स्मृती मंधाना-पलाश मुच्छलच्या हळदीचा व्हिडीओ समोर, 'वर्ल्डकप विनर' नवरी मांडवात तुफान नाचली!

स्मृती मंधानाच्या नातेवाईकाने माध्यमांशी बोलताना काय म्हटलं?

स्मृती मंधानाच्या एका नातेवाईकाने माध्यमांशी बोलताना म्हटलं की,"स्मृती मंधानाचे वडील श्रीनिवास मंधाना जेव्हा सकाळी ब्रेकफास्ट करत होते,तेव्हा त्यांची तब्येत खराब झाली होती. आम्हाला वाटलं तब्येत काही वेळानंतर ठीक होईल. पण काही वेळानंतर त्यांची तब्येत आणखी बिघडली. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. स्मृती मंधानाचं तिच्या वडिलांवर खूप प्रेम आहे. जोपर्यंत वडील ठीक होत नाहीत, तोपर्यंत लग्नसोहळा पुढे ढकलण्यात आला आहे, असा निर्णय स्मृती मंधानाने घेतला आहे".

डॉ.नमन शहा काय म्हणाले?

स्मृती मंधानाच्या वडिलांची सध्या प्रकृती स्थिर आहे. त्यांना हृदय विकार असल्याची लक्षणे आहेत. रक्तातील अनेक चाचण्या करण्यात आल्या आहेत. छातीत दुखणे, सौम्य हृदय विकार लक्षणे आहेत. लक्षणानुसार त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.ब्लड प्रेशर वाढलं आहे.रक्तातील इंजाईम वाढलं आहे. गरज पडली तर एन्जिओग्राफी करावी लागू शकते.श्रीनिवास मंधाना यांना यापूर्वी हृदय विकाराचा त्रास झाला नाही.त्यांना 12 तास निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती डॉक्टर नमन शहा यांनी दिलीय.
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com