'मी टीमला निराश करत होतो', पंजाब किंग्जच्या दिग्गजाची अचानक निवृत्ती

Glenn Maxwell announces ODI retirement:  ऑस्ट्रेलियाचा स्फोटक बॅटर ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) वन-डे क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Glenn Maxwell announces ODI retirement:  ऑस्ट्रेलियाचा स्फोटक बॅटर ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) वन-डे क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर केली आहे. तो T20 क्रिकेट मात्र खेळत राहणार नाही. मॅक्सवेलनं 2012 साली अफगाणिस्ताविरुद्ध पदार्पण केलं होतं. त्यानं 149 वन-डे मॅचमध्ये 33.81 च्या सरासरीने आणि 126.70 च्या स्ट्राइक रेटने 3,990 रन्स केले. उपयुक्त ऑफ स्पिनर असलेल्या मॅक्सवेलनं या फॉर्मेटमध्ये 77 विकेट्स घेतल्या  आणि 91 कॅच पकडले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाला मॅक्सवेल?

मॅक्सवेलने 'फायनल वर्ड पॉडकास्ट'वर त्याच्या निवृत्तीबद्दल माहिती दिली. तो म्हणाला 'मी (निवड समितीचे अध्यक्ष) जॉर्ज बेली यांच्याशी बोललो आणि त्यांना पुढील योजनांबद्दल विचारले. आम्ही 2027 च्या विश्वचषकाबाबत चर्चा केली आणि मी त्यांना सांगितले, 'मला नाही वाटत की मी त्यात यशस्वी होऊ शकेन, आता माझ्या जागी इतर खेळाडूंना संधी देण्याची वेळ आली आहे. ते टीमला पुढे नेतील तसंच त्यांना पुरेशी संधी मिळेल.'

मॅक्सवेल पुढे म्हणाला, 'मी नेहमीच म्हणत आलो आहे की,  मला वाटले की मी माझ्या टीमसाठी समान योगदान देत आहे, तर मी कधीही वनडे क्रिकेट सोडणार नाही. पण मी स्वार्थी कारणांसाठी खेळू इच्छित नव्हतो.' विशेष म्हणजे मॅक्सवेलचा वन-डे क्रिकेटमध्ये 126 स्ट्राईक रेट आहे. या प्रकारात सर्वाधिक स्ट्राईक रेटच्या यादीमध्ये तो वेस्ट इंडिजचा ऑल राऊंडर आंद्रे रसेलनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.

( नक्की वाचा :  Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेनं वाढवलं टेन्शन! MCA ची मनधरणीसाठी धावाधाव )

मी निराश करत आहे....

वन-डे क्रिकेटमधून निवृत्तीच्या निर्णयाबाबत मॅक्सवेल म्हणाला की, 'मला वाटले की मी संघाला थोडे निराश करत आहे, कारण शरीर परिस्थितीनुसार प्रतिक्रिया देत नव्हते. मी (निवड समितीचे अध्यक्ष) जॉर्ज बेली यांच्याशी चर्चा केली आणि या निर्णयावर पोहोचलो आहे.'

Advertisement

वर्ल्ड कप जिंकण्यात योगदान

2023 मधील वन-डे वर्ल्ड कप जिंकण्यात मॅक्सवेलचं मोलाचं योगदान होतं. त्यानं त्या वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध टीम अडचणीत असताना तुफानी फटकेबाजी करत 201 रन्सची खेळी केली. मॅक्सवेलच्या या खेळीनं ऑस्ट्रेलियाच्या खेळाचा नूर पालटला आणि त्यांनी पुढे तो वर्ल्ड कप जिंकला. त्यानं वन-डे क्रिकेटमध्ये 4 सेंच्युरी झळकावल्या आहेत. 

पंजाब किंग्जचा खेळाडू

मॅक्सवेल या सिझनमध्ये पंजाब किंग्जकडून खेळला आहे. पण, त्याची कामगिरी खराब ठरली. त्यानं 7 मॅचमध्ये फक्त 48 रन्स केले.  त्यानंतर त्यानं दुखापतीमुळे आयपीएल 2025 मधून माघार घेतली. 

Advertisement
Topics mentioned in this article