
बहुप्रतिक्षित T-20 मुंबई लीगच्या (TML) तिसऱ्या सिझनचं काऊंटडाऊन सुरु झालं आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियम आणि नवी मुंबईतील डी.वाय. पाटील 4 ते 12 जून दरम्यान हा सिझन होणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशननं (MCA) या सिझनची तयारी पूर्ण केलीय. 2019 नंतर पहिल्यांदाच ही स्पर्धा होणार असल्यानं ती यशस्वी करण्याचा मुंबई क्रिकेट असोसिएशनचा प्रयत्न आहे. पण, त्यांच्या या प्रयत्नांना दिग्गज क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेनं (Ajinkya Rahane) धक्का दिला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अजिंक्य रहाणेचा धक्का
अजिंक्य रहाणे या स्पर्धेत खेळण्याची शक्यता कमी आहे. 'मिड डे' नं दिलेल्या वृत्तानुसार अजिंक्यनं आपण ही स्पर्धा खेळू शकणार नसल्याचा ईमेल मुंबई क्रिकेट असोसिएशनला पाठवला आहे. एमसीएचे सचिव अभय हडप यांनी त्याला दुजोरा देखील दिला आहे, असं या वृत्तात स्पष्ट करण्यात आलंय.
दिग्गज खेळाडूंची अनुपस्थिती
T-20 मुंबई लीगमधील बांद्रा ब्लास्टरचा (Bandra Blasters) आयकॉन खेळाडू आणि कॅप्टन आहे. अजिंक्य प्रमाणेच या टी-20 स्पर्धेत टीम इंडियाचा ऑलराऊंडर गोलंदाज शार्दुल ठाकूर देखील खेळू शकणार नाही. त्याला ईगल ठाणे स्ट्रायकर्सने आपला आयकॉन खेळाडू म्हणून निवडले होते. मात्र, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील टेस्ट टीममध्ये त्याची निवड झालीय. तो इंग्लड दौऱ्यात असल्यानं ही स्पर्धा खेळू शकणार नाही. इंग्लंडमध्ये राष्ट्रीय कर्तव्यावर असल्याने तो अनुपस्थित राहणार आहे.
( नक्की वाचा : IND vs ENG : 10 किलो वजन कमी केलं पण तरीही सरफराजचं काय चुकलं? 3 कारणांमुळे झाली नाही निवड )
याव्यतिरिक्त, आकाश टायगर्स मुंबई वेस्टर्न सबर्ब्स संघाचा सरफराज खान, मुंबई साउथ सेंट्रल मराठा रॉयल्सचा तुषार देशपांडे आणि नॉर्थ मुंबई पँथर्सचा तनुष कोटियन हे देखील टीएमएलमध्ये खेळू शकणार नाहीत. हे सर्व खेळाडू भारत 'अ' संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर असणार आहेत. त्यापाठोपाठ रहाणेनं देखील खेळणार नसल्याचं कळवल्यानं मुंबई क्रिकेटला धक्का बसला आहे.
'आम्हाला तो [अजिंक्य रहाणे] टी-20 मुंबई लीगमध्ये खेळलेला आवडेल. त्याला तयार करण्यासाठी आम्ही त्याच्याशी बोलणार आहोत. तो खेळला तर लीगचे महत्त्व वाढेल,' असे MCA हडप सचिव हडप यांनी सांगितलं आहे.
बँड्रा ब्लास्टर्सचे मुख्य प्रशिक्षक उमेश पटवाल यांनी सांगितले की, संघाचे मालक रहाणेच्या संपर्कात आहेत. 'आमचे संघमालक [प्रवीण अग्रवाल] सध्या त्याच्या (अजिंक्य रहाणे) संपर्कात आहेत आणि त्याने लवकरच आपल्या योजनांबद्दल कळवेल असे सांगितले आहे,' असे पटवाल म्हणाले.
( नक्की वाचा : Yashasvi Jaiswal : यशस्वी जैस्वाल सोडणार राजस्थान रॉयल्सची साथ? Instagram पोस्टनं खळबळ )
कोणते स्टार खेळणार?
अजिंक्यचा समावेश निश्चित नसला तरी टीएमलमध्ये क्रिकेट फॅन्सना अनेक स्टार खेळाडूंचा खेळ पाहायला मिळणार आहे. यामध्ये टीम इंडियाच्या T20 टीमचा कॅप्टन सूर्यकुमार यादव (ट्रायम्फ नाईट्स मुंबई नॉर्थ ईस्ट), पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर (सोबो मुंबई फाल्कन्स), भारताचा अष्टपैलू शिवम दुबे (एआरसीएस अंधेरी) आणि पृथ्वी शॉ (नॉर्थ मुंबई पँथर्स) यांचा समावेश आहे.
दरम्यान, सोमवारी एमसीएने पावसामुळे मुलामुलींच्या सर्व वयोगटातील उन्हाळी शिबिरातील सामने रद्द केले होते. मात्र, एमसीए टीएमएलचे सामने ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world