टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रस्त्याच्या मधोमध एका लोडिंग ऑटोला धडक दिल्यानंतर द्रविड ऑटो चालकाशी वाद घालताना दिसत आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ बंगळुरूचा असल्याचे सांगितले जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (4 फेब्रुवारी) रोजी रस्त्यावर उभ्या असलेल्या द्रविडच्या एसयूव्ही कारला मागून येणाऱ्या एका लोडिंग ऑटो चालकाने अचानक धडक दिली. त्यानंतर द्रविडला ऑटो ड्रायव्हरवर संतापल्याचे दिसून आले. राहुल द्रविड रस्त्यावर कार उभी करुन कारच्या नुकसानीची पाहणी करताना दिसता. ज्यामध्ये तो ऑटो चालकाला जाब विचारताना दिसत आहे.
(नक्की वाचा- Crime News : घरापासून अवघ्या 100 मीटरवरुन बिल्डरच्या मुलाला पळवलं, तासाभराने फोन आला अन् कुटुंब हादरलं!)
मंगळवारी संध्याकाळी बंगळुरूच्या हाय ग्राउंड्स ट्रॅफिक पोलिस स्टेशन परिसरात ही घटना घडली. याबाबत अद्याप कोणतीही तक्रार पोलिसाना प्राप्त झाली नाही. या धडकेत राहुल द्रविडच्या कारचं मागच्या बाजूने मोठं नुकसान झालं आहे.
(नक्की वाचा : Crime News : मुलीचा आनंद पाहवेना; आंतरधर्मीय लग्न केल्याच्या रागातून कुटुंबांचं घृणास्पद कृत्य)
राहुल द्रविड गाडीचं झालेलं नुकसाना पाहून काहीसा रागावलेला दिसत होता. यामुळेच त्याचा राग अनावर झाला आणि त्याने ऑटो चालकाला याबाबत जाब विचारला. कन्नड भाषेत तो बोलत असल्याचे दिसून येत आहे. एवढेच नाही तर निघण्यापूर्वी त्याने ऑटो चालकाचा फोन नंबर आणि नोंदणी क्रमांकही घेतला.