
Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरहून (Chhatrapati Sambhajinagar) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील नामांकित बिल्डरच्या मुलांचं दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी (Kidnapping) अपहरण करण्यात आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे घरापासून अवघ्या 100 मीटर अंतरावरील सेंट्रल मॉल येथून मुलाचे अपहरण झालं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुलगा घराजवळ सायकलवरुन फिरत असताना काळ्या रंगाची चारचाकी आली अन् मुलाला वडिलांसमोर उचलून नेल्याची माहिती आहे. चैतन्य सुनील तुपे (7 वर्षे) असं अपहरण झालेल्या मुलाचं नाव आहे. अपहरणानंतर दोन कोटी खंडणीसाठी वडिलांना फोन आहे. हा फोन हसनाबादहून आल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. अपहरणाच्या घटनेने संभाजीनगर शहरात खळबळ उडाली आहे.
नक्की वाचा : Crime News : मुलीचा आनंद पाहवेना; आंतरधर्मीय लग्न केल्याच्या रागातून कुटुंबांचं घृणास्पद कृत्य
मिळालेल्या माहितीनुसार, घरापासून अवघ्या 100 मीटर अंतरावरील सेंट्रल मॉल येथून अपहरण झालं. जेवल्यानंतर वडील आणि मुलगा फिरण्यासाठी खाली गेले होते. वडील पुढे चालत होते तर मुलगा सायकलवरुन जात होता. त्याचवेळी काळ्या रंगाची कार आली. त्यातून तिघेजण उतरले आणि त्यांनी चेतनला बळजबरीने गाडीत कोंबलं. साधारण 8.45 मिनिटांनी हा सर्व प्रकार घडला. यानंतर तब्बल एका तासाने तुपे कुटुंबाला खंडणीखोरांकडून दोन कोटींसाठी फोन आला. हा फोन हसनाबादहून आल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world