Asia Cup 2025: टीम इंडिया आशिया कपवर बहिष्कार घालणार? BCCI नं NDTV ला दिली मोठी माहिती

BCCI on Asia Cup 2025: सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या आशिया कप क्रिकेट स्पर्धेवर बीसीसीआयनं बहिष्कार घातला आहे, असं वृत्त माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालं होतं.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

BCCI on Asia Cup 2025: आशिया खंडातील क्रिकेट टीमसाठी प्रतिष्ठेची मानली जाणाऱ्या आशिया कप 2025 चे आयोजन याच वर्षी सप्टेंबरमध्ये होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव गेल्या काही दिवसांमध्ये वाढला आहे. त्यामुळे ही स्पर्धा संकटात सापडली आहे. बीसीसीआयनं यावर्षीच्या स्पर्धेवर बहिष्कार घातलाय, अशी माहिती काही मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. या सर्व चर्चेवर बीसीसायनं एक महत्त्वाचं स्पष्टीकरण दिलं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

बीसीसीआयच्या सूत्रांनी एनडीटीव्हीला सांगितले आहे की बोर्डाने अद्याप असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. बीसीसीआयच्या सूत्रांनी पुढे म्हटले, या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही. बीसीसीआयने अद्याप एसीसीच्या आगामी कार्यक्रमांविषयी कोणतीही चर्चा किंवा कोणतेही पाऊल उचललेले नाही, एसीसीला काहीही लिहिणे तर दूरची गोष्ट आहे. बीसीसीआयचे सध्याचे मुख्य लक्ष सध्या असलेल्या आयपीएल आणि त्यानंतर इंग्लंडमध्ये होणाऱ्या पुरुष आणि महिला टीमच्या सीरिजवर आहे.'

सूत्रांनी पुढे हे देखील सांगितले की, आशिया कपचा विषय किंवा एसीसीच्या इतर कोणत्याही कार्यक्रमाशी संबंधित मुद्दा कोणत्याही स्तरावर चर्चेसाठी आलेला नाही, त्यामुळे त्यावर कोणतीही बातमी किंवा रिपोर्ट पूर्णपणे काल्पनिक आहे. बीसीसीआय एसीसीच्या कोणत्याही कार्यक्रमावर चर्चा करेल आणि महत्त्वाचा निर्णय घेतला जाईल, तेव्हा माध्यमांद्वारे त्याची घोषणा केली जाईल.

( नक्की वाचा : IND vs ENG : 'हार्दिक पांड्या' फॅक्टरमुळे जसप्रीत बुमराहला कॅप्टनसी नाही! माजी कोचनं सांगितलं कारण )
 

यापूर्वी मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, बीसीसीआय आशिया कप स्पर्धेवर बहिष्कार घालण्याच्या तयारीत आहे.  पाकिस्तान क्रिकेटला एकाकी पाडण्याच्या प्रयत्नाचा हा एक भाग आहे. भारतीय संघ पाकिस्तानी मंत्र्यांच्या नेतृत्वाखालील स्पर्धेत सहभागी होऊ शकत नाही. ही देशाची भावना आहे. स्पर्धांमधून माघार घेतल्याबद्दल एसीसीला तोंडी कळवले आहे आणि त्यांच्या स्पर्धांमध्ये आमचा भविष्यातील सहभाग देखील थांबवण्यात आला आहे. आम्ही भारत सरकारशी सतत संपर्कात आहोत, असं बीसीसीआयने कळवलं आहे. '

Advertisement

 2024 साली सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडिया (एसपीएनआय) ने १७० मिलियन अमेरिकन डॉलर्सच्या शुल्कात आशिया कपचे मीडिया अधिकार खरेदी केले होते. यापूर्वी 2023 मधील आशिया कप स्पर्धा हायब्रिड मॉडेलनुसार झाली होती. त्यामध्ये भारताचे सामने श्रीलंकेत तर अन्य सामने यजमान पाकिस्तानमध्ये झाले होते. भारतानं त्या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. पाकिस्तानची टीम फायनलसाठी पात्र होऊ शकली नव्हती.  
 

Topics mentioned in this article