India's Squad For Asia Cup: यशस्वी जैस्वालसह 3 मोठ्या स्टार्सना मिळणार नाही जागा! वाचा कशी असेल टीम?

India's Squad For Asia Cup: इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सीरिजनंतर आशिया कप हे टीम इंडियापुढील पुढील आव्हान आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Yashasvi Jaiswal : आशिया कपसाठी यशस्वी जैस्वाला संधी मिळणार नसल्याची शक्यता आहे.
मुंबई:

India's Squad For Asia Cup: इंग्लंड विरुद्धच्या टेस्ट सीरिजनंतर आशिया कप हे टीम इंडियापुढील पुढील आव्हान आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती 19 किंवा 20 ऑगस्ट रोजी आशिया चषकासाठी संघाची निवड करण्याची शक्यता आहे.

या अहवालानुसार, बीसीसीआयची निवड समिती सध्याच्या टीममध्ये फारसा बदल करण्यास उत्सुक नाही. अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्या अशी मजबूत टॉप 5 टीम इंडियाकडं आहे. त्यात बदल होण्याची शक्यता नाही. 

बीसीसीआयच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, “अभिषेक शर्मा हा आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत जगातील नंबर 1 टी-20 फलंदाज आहे. संजू सॅमसनने गेल्या सिझनमध्ये बॅटिंग आणि विकेट किपिंग दोन्हीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यामुळे हा एक कठीण निर्णय असेल पण शुभमन गिलला त्याच्या सध्याच्या फॉर्ममुळे त्याला दुर्लक्षित करता येणार नाही. त्यानं आयपीएलमध्येही चांगली कामगिरी केली होती. 

टॉप ऑर्डरमध्ये इतके खेळाडू असल्याने यशस्वी जैस्वाल आणि साई सुदर्शन यांना आशिया कपच्या टीममध्ये मिळणे अवघड आहे. त्याचबरोबर इंग्लंड दौऱ्यात दमदार कामगिरी करणाऱ्या केएल राहुलचाही टीममध्ये समावेश होण्याची शक्यता कमी आहे. केएल राहुल वन-डे टीममध्ये पहिल्या पसंतीचा विकेट किपर आहे. पण, त्याची टी 20 टीममध्ये निवड होणे कठीण मानलं जात आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Asia Cup 2025: ठरलं! आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार, कधी अन् कुठे होणार स्पर्धा? वाचा डिटेल्स )
 

दुसरा विकेट किपर कोण?

संजू सॅमसम टीम इंडियाचा पहिल्या पसंतीचा विकेट किपर असेल हे जवळपास निश्चित आहे. तर दुसऱ्या विकेट किपरच्या जागेसाठी जितेश शर्मा आणि ध्रुव जुरेल यांच्यात चुरस असेल. जुरेल शेवटच्या टी-20 सीरिजचा भाग होता, तर जितेशने आयपीएलमध्ये आरसीबीसाठी प्रभावी कामगिरी केली होती. त्याने फिनिशर म्हणूनही चांगली भूमिका बजावली आहे.

ऑलराऊंडर कोण?

व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये ऑलराऊंडर म्हणून हार्दिक पांड्या ही पहिली पसंती आहे.इंग्लंड मालिकेदरम्यान जखमी झालेला नितीश कुमार रेड्डी वेळेत तंदुरुस्त होण्याची शक्यता कमी आहे. ऑल राऊंडर शिवम दुबेला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

Advertisement

अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर हे टीममधील इतर दोन स्पिन बॉलर-ऑलराऊंडर असतील.  

( नक्की वाचा : Shubman Gill : इंग्लंड दौऱ्यानंतर शुबमन गिलचं प्रमोशन, आशिया चषकमध्ये मिळणार मोठी जबाबदारी! )
 

फास्ट बॉलर्समध्ये स्पर्धा

फास्ट बॉलर अर्शदीप सिंगची जागा निश्चित आहे. जसप्रीत बुमराह उपलब्ध असेल तर त्याचाही टीममध्ये समावेश होईल. तिसऱ्या जागेसाठी मागील आयपीएल सिझनमध्ये 25 विकेट्स घेणारा प्रसिध कृष्णा आणि हर्षित राणा यांच्यात स्पर्धा आहे. 

संभाव्य खेळाडू: सूर्यकुमार यादव (कॅप्टन), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेट किपर), तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षित राणा/प्रसिद्ध कृष्णा, हार्दिक पंड्या, जितेश शर्मा/ध्रुव जुरेल.
 

Advertisement
Topics mentioned in this article