पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला मोठा धक्का बसला आहे. कुस्तीच्या फायनलमध्ये पोहोचलेल्या विनेश फोगाट हिला अपात्र ठरवण्यात आलं आहे. 50 किलो वजनी गटात खेळणाऱ्या विनेश फोगाटचं वजन अवघ 100 ग्रॅम वजन जास्त भरल्याने तिला अपात्र घोषित करण्यात आलं आहे. त्यामुळे विनेश कोणताच सामना खेळू शकणार नाही.
भारतीय ऑलिम्पिक पथकाने विनेशबाबत ऑलिम्पिक समितीने दिलेला निर्णय मान्य केला आहे. विनेशचं वजन वाढल्याचं भारतीय ऑलिम्पिक पधकाला रात्रीच समजलं होतं. काल झालेल्या सामन्यानंतर विनेशने लगेच दोरीच्या उड्या मारायला सुरुवात केली होती. भारतील ऑलिम्पिक पथकाने विनेश फोगाट यांचा वजन मोजण्याच्या प्रक्रियेसाठी अतिरिक्त वेळ देण्याची विनंती केली होती. मात्र ती विनंती फेटळण्यात आली.
(नक्की वाचा- वजन होईल पटकन कमी, घरच्या घरी करा हे ड्रिंक)
प्रत्येक सामन्याआधी खेळाडूचं वजन केलं जातं. काल झालेल्या सामन्याआधी विनेशचं वजन 50 किलो होतं. पण आज सकाळी झालेल्या वजन चाचणीत विनेशचं वजन जास्त भरलं. अशारितीने ऑलिम्पिकच्या कठोर नियमांपुढे विनेश फोगाटची एवढ्या वर्षांची मेहनत वाया गेली आहे.
UWW चा नियम काय सांगतो?
युनायटेड वर्ल्ड रेसलिंगच्या (UWW) नियामानुसार, एखाद्या अॅथलिट वजन मोजणाच्या प्रक्रियेत भाग घेत नाही किंवा त्यात तो अपात्र झाल्यास त्याला स्पर्धेतून बाहेर पडावं लागतं. त्या खेळाडून शेवटच्या स्थानावर ठेवलं जातं.
विनेश तू चॅम्पियन आहेस - PM मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत विनेश फोगाटला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. विनेश तू चॅम्पियन आहेस. तू भारताचा अभिमान आहेस आणि प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणा आहेस. आव्हाने स्वीकारणे हा तुमचा नेहमीच स्वभाव राहिला आहे.