जाहिरात

IND vs AUS : ट्रॅव्हिस हेडवर कारवाई होणार? पंतला आऊट केल्यानंतर वादग्रस्त सेलिब्रेशन, काय आहे अर्थ?

Travis Head controversial celebration : ट्रॅव्हिस हेडनं हेडनं यावेळी केलेले हावभाव घाणेरडे आणि विचित्र होते, अशी टीका क्रिकेट फॅन्स करत आहेत.

IND vs AUS : ट्रॅव्हिस हेडवर कारवाई होणार? पंतला आऊट केल्यानंतर वादग्रस्त सेलिब्रेशन, काय आहे अर्थ?
मुंबई:

Travis Head controversial celebration : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात मेलबर्नमध्ये झालेल्या टेस्टध्ये टीम इंडियाचा 184 रननं पराभव झाला. या पराभवानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्शिपच्या (WTC) फायनलमध्ये जाण्याचं टीम इंडियाचं स्वप्न जवळपास संपुष्टात आलंय. ऑस्ट्रिलियानं या सीरिजमध्ये 2-1 अशी आघाडी घेतलीय. आता तब्बल 10 वर्षांनी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकण्याची त्यांना संधी आहे.

ऑस्ट्रेलियानं हा सामना जिंकला असला तरी या मॅचमधील शेवटचा दिवस चांगलाच रंगतदार ठरला. यशस्वी जैस्वालला थर्ड अंपायरनं आऊट देण्याचा निर्णय चांगलाच चर्चेत आहे. यशस्वीनं देखील या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.  त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडनं केलेलं एक सेलिब्रेशन देखील चांगलंच वादग्रस्त ठरलंय. या सेलिब्रेशननंतर त्याच्यावर कारवाई होणार का? हा प्रश्न क्रिकेट फॅन्स विचारत आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

नेमकं काय घडलं?

मेलबर्न टेस्ट जिंकण्यासाठी टीम इंडियासमोर 340 रनचं लक्ष्य होतं. भारतीय टीमची सुरुवात खराब झाली. रोहित, राहुल आणि विराट स्वस्तात आऊट झाले. त्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि ऋषभ पंत ही जोडी जमली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 197 बॉलमध्ये 88 रनची पार्टरनशिप केली. टीम इंडियाचा पराभव टाळण्याचा आटोकाट प्रयत्न यशस्वी-पंत जोडीनं केला.

भारतीय टीमनं नेहमी बॅटनं तडाखा देणाऱ्या ट्रॅव्हिस हेडनं बॉलिंगमध्ये कमाल करत ही जोडी फोडली. हेडच्या बॉलिंगवर मोठा फटका मारण्याचा पंतचा प्रयत्न फसला. तो मिचेल मार्शकडं कॅच देऊन 30 रनवर आऊट झाला. पंत आऊट झाल्यानंतर हेडनं केलेल्या सेलिब्रेशनवर वाद निर्माण झालाय.

( नक्की वाचा : IND vs AUS : नितिश रेड्डीच्या वडिलांनी नोकरी का सोडली? कारण समजल्यावर तुम्ही म्हणाल पापा द ग्रेट!)
 

हेडनं यावेळी केलेले हावभाव घाणेरडे आणि विचित्र होते, अशी टीका क्रिकेट फॅन्स करत आहेत. याच मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा ओपनर सॅम कोन्स्टासला धक्का दिल्याबद्दल विराटवर कारवाई करण्यात आली आहे. या कृतीबद्दल विराट कोहलीच्या मॅच फिसमधील 20 टक्के रक्कम कमी करण्यात आलीय. त्याचबरोबर त्याला 1 डिमेरीट पॉईंटही देण्यात आलाय. विराटप्रमाणेच हेडवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

काय आहे अर्थ?

ऑस्ट्रेलियन वाहिनी सेव्हननं केलेल्या दाव्यानुसार ट्रॅव्हिस हेडची ही जुनी सवय आहे. यापूर्वी 2022 मध्ये श्रीलंकेविरुद्ध बॉलिंग केल्यानंतर हेडला त्याचं बोट बर्फावर ठेवावं लागलं होतं. हेडच्या या कृतीला त्याचा संदर्भ आहे. मी हे यापूर्वी केलं होतं आणि आता पुन्हा एकदा मी बोट बर्फावर ठेवणार आहे, असं हेड सांगतोय, असं या वाहिनीनं स्पष्ट केलं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com