जाहिरात

IND vs AUS : नितिश रेड्डीच्या वडिलांनी नोकरी का सोडली? कारण समजल्यावर तुम्ही म्हणाल पापा द ग्रेट!

IND vs AUS : नितिश रेड्डीच्या वडिलांनी नोकरी का सोडली? कारण समजल्यावर तुम्ही म्हणाल पापा द ग्रेट!
मुंबई:

India vs Australia,  Nitish Kumar Reddy : नितीश कुमार रेड्डी पुन्हा एकदा टीम इंडियाचा संकटमोचक बनला आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात मेलबर्नमध्ये सुरु असलेल्या टेस्टमध्ये नितीशनं सेंच्युरी झळकावली. मेलबर्न टेस्टच्या तिसऱ्या दिवशी नितीश आठव्या क्रमांकावर मैदानात उतरला होता. तो उतरला तेव्हा भारतीय टीम अडचणीवर होती. टीमवर फॉलो ऑनचं सावट होतं. पण, नितीशनं संकट काळात सेंच्युरी झळकावत फॉलो ऑनची नामुश्की टाळलीच. त्याचबरोबर टीम इंडियाला मॅचमध्ये परत आणलं. नितीशच्या या सेंच्युरीमुळे प्रत्येक भारतीय फॅन खुश आहे. त्याचवेळी मेलबर्नच्या मैदानावरील एका व्यक्तीला त्यावेळी अश्रू लपवता आले नाहीत. त्या व्यक्तीच्या आजवरच्या आयुष्यातील हा सर्वोच्च प्रसंग होता. त्यामुळेच ते अश्रू अनमोल आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

नितीशची सेंच्युरी पाहून भर मैदानात रडत असलेली ती व्यक्ती होती मुत्याला रेड्डी. नितीश कुमार रेड्डीचे बाबा. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडच्या ऐतिहासिक मैदानात त्यांच्या मुलानं सेंच्युरी पूर्ण करत प्रेक्षकांना अभिवादन करण्यासाठी बॅट उचलली. त्यावेळी मैदानातील 80 हजार प्रेक्षक त्याला अभिवादन करण्यासाठी उभी राहिली. तो प्रसंग पाहून मुत्यूला यांना अश्रू आवरले नाहीत. त्यांनी देवाचं नामस्मरण करण्यासाठी हात जोडले. ते हात जोडून रडत होते. त्यांचा आजवरचा संघर्ष मुलाच्या खेळीनं सुफळ संपूर्ण झाला होता. 

मुलासाठी सोडली नोकरी

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सीरिजमधील प्रत्येक लढतीत नितीशनं झुंजार खेळी केली आहे. या सीरिजमुळे प्रत्येक भारतीय फॅन्सच्या तोंडावर त्याचं नाव आहे. नितीश इथपर्यंत कसा पोहचला? ही गोष्ट मोठी रोचक आहे. या संपूर्ण प्रवासात नितीशनं प्रचंड कष्ट घेतले आहेत, यात कोणतीही शंका नाही. पण, त्याचवेळी त्यांच्या वडिलांचं योगदानही विसरता येणार नाही. त्यांनी मुलाचं स्वप्न पाहण्यासाठी सर्वोच्च त्याग केला. त्यामुळेच टीम इंडियाला एक लढाऊ क्रिकेटपटू मिळाला. 

नितीश कुमार रेड्डी मुळचा आंध्र प्रदेशातील आहेत. त्याला लहानपणापासूनच क्रिकेट आवड होती. मुलाची आवड पाहून त्याला क्रिकेटमध्ये संपूर्ण करिअर करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचं मुत्यूला यांनी ठरवलं. नितीश सुरुवातीला प्लास्टिक बॉलनं क्रिकेट खेळत असे.

नितीशचं क्रिकेट प्रशिक्षण सुरु झालं होतं. त्याचवेळी त्याच्या वडिल मुत्याला रेड्डी जिथं काम करत होते त्या कंपनीनं (हिंदुस्थान जिंक) त्यांची बदली विशाखापट्टणमहून उदयपूरला केली. या बदलीचा मुलाच्या करियरवर परिणाम होईल ही भीती त्यांना वाटत  होती. त्यावेळी त्यांनी मोठा निर्णय घेतला. त्यांनी नोकरी सोडली.

( नक्की वाचा : विराटनं यशस्वी जैस्वालला रन आऊट केलं? मांजरेकर-इरफान पठाणमध्ये जोरदार वाद, Video )
 

काय होतं कारण?

मुत्याला रेड्डी यांनी नोकरी सोडण्याचं एक खास कारण होतं. ते नोकरीसाठी उदयपूरला शिफ्ट झाले असते तर त्यांच्या मुलाच्या खेळावर परिणाम झाला असता. त्यामुळे त्यांनी त्यांचं संपूर्ण लक्ष मुलाच्या क्रिकेटवरच केंद्रीत केलं. 

मुत्याला यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय सोपा नव्हता. त्यांच्या नातेवाईंकानीच या निर्णयावर टीका केली. पण, ते त्यांच्या निर्णयावर ठाम होते. त्यांच्या निश्चयाचं फळ आज मिळालं आहे. नितीशनं मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर सेंच्युरी झळकावलीय. संपूर्ण क्रिकेट विश्व त्याच्या खेळाचं आज कौतुक करतंय. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com