RCB की CSK, मुकाबल्यात कोण जिंकणार? लाराने स्पष्टपणे सांगितले

Brain Lara on RCB vs CSK IPL 2024 प्लेऑफ मध्ये स्थान मिळवण्यासाठी 18 मे रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध रॉयल चॅलेजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार आहे. या दोघांमध्ये जो जिंकेल तो प्ले ऑफमध्ये पोहोचणार आहे.

Advertisement
Read Time: 3 mins

Brain Lara Prediction on RCB vs CSK Playoff Entry : सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामना पावसात वाहून गेला होता. या सामन्यात नाणेफेकही होऊ शकली नव्हती. यामुळे हैदराबादचा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचला होता. 2024 च्या आयपीएलबाबत बोलायचे झाल्यास (IPL 2024 Points Table) गुणतालिकेत कोलकाता नाईट रायडर्स संघ पहिल्या स्थानावर आहे.

दुसऱ्या स्थानावर राजस्थान रॉयल्स संघ आहे. तिसऱ्या स्थानावर सनरायझर्स हैदराबादचा संघ आहे. गुजरातविरूद्धचा सामना पावसात वाहून गेल्याचा फायदा या संघाला झाला होता. आता बाद फेरीत धडक मारणारा चौथा संघ कोण असेल याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. 18 मे रोजी  चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध रॉयल चॅलेजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार आहे. या दोघांमध्ये जो जिंकेल तो प्ले ऑफमध्ये पोहोचणार आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

RCB आणि सीएसके हे दोन्ही संघ अत्यंत ताकदवान संघ आहे. यामुळे हा सामना अत्यंत चुरशीचा ठरणार आहे यात वाद नाही. मात्र हा सामना कोण जिंकेल याबाबत आतापासूनच चर्चा सुरू झाली आहे. वेस्ट इंडीजचा माजी क्रिकेटपटू ब्रायन लाराने या सामन्यात काय होईल याबाबत अंदाज वर्तवला आहे. या महत्त्वाच्या आणि हाय व्होल्टेज सामन्यात काय होईल याबाबत लाराने आपले मत मांडले आहे.

(नक्की वाचा-  RCB चं 'प्ले ऑफ' गाठण्याचं स्वप्न राहणार अपूर्ण! CSK विरुद्धच्या मॅचपूर्वी Video Viral)

आरसीबीला बाद फेरीत स्थान मिळवण्यासाठी हा सामना जिंकावाच लागेल. चेन्नईचा संघ हरूनही बाद फेरीत स्थान मिळवू शकतो मात्र त्यासाठी त्यांना त्यांचा रन रेट हा आरसीबी पेक्षा जास्त टेवावा लागेल. लाराच्या मते हा सामना राजस्थानचा संघ जिंकण्याची दाट शक्यता आहे. Brian Lara Predict RCB win vs CSK)

Advertisement

आरसीबीचा संघ हा फॉर्ममध्ये असून त्यांनी 5 सामने जिंकले आहेत. या वर्षी इतर कोणत्याही संघाला असे करता आलेले नाहीये. राजस्थानच्या संघाकडे विराट कोहली सारखा तगडा खेळाडू असून तो जबरदस्त फॉर्मात आहे. कोहली व्यतिरिक्त त्याच्या संघातील इतर क्रिकेटपटूही चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. हा संघ चांगल्या फॉर्मात असून हीच त्यांच्यासाठी जमेची बाजू असल्याचे लाराचे म्हणणे आहे. 

( नक्की वाचा : T20 World Cup : रोहित आणि आगरकरच्या मनाविरुद्ध झाली हार्दिक पांड्याची निवड! )

RCBच्या संघाने आतापर्यंत कधीही आयपीएल चषक जिंकलेला नाही. या स्पर्धेचे जेतेपद मिळवण्यासाठी हा संघ जबरदस्त मेहनत करताना दिसत आहे. हीच बाब त्यांना अंतिम फेरीत पोहचवण्यासाठी मदत करणारी ठरेल असेल लारा याचे म्हणणे आहे. फाफ ड्यु प्लेसिस, मोहम्मद सिराज आणि विराट कोहलीसारखे तगडे क्रिकेटपटू राजस्थानच्या संघात असून हा संघ चांगली कामगिरी करत आहे.

Advertisement

आरसीबीचा यंदाच्या आयपीएलमधला आतापर्यंतचा प्रवास पाहिल्यास हा संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार दिसत आहे असे लारा याने म्हटले आहे. तुम्हाला काय वाटतं ? आजच्या सामन्यात कोण जिंकेल, आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

Topics mentioned in this article