आयपीएल 2024 मधील 'प्ले ऑफ' चे सामने मंगळवारपासून सुरु होतील. प्ले ऑफमधील चार पैकी तीन टीम आता निश्चित झाल्या आहेत. कोलकाता नाईट रायडर्स (KKR), राजस्थान रॉयल्स (RR) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) या तीन टीमनी प्ले ऑफमधील प्रवेश नक्की केलाय. चौथ्या जागेसाठी चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) या दोन टीममध्ये चुरस आहे. बंगळुरुमधील चिन्नास्वामी स्टेडियमवर शनिवारी (18 मे) रोजी हा सामना होणार आहे.
प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी दोन्ही टीमना हा सामना जिंकणं आवश्यक आहे. पण, बंगळुरुमध्ये 17 ते 21 मे च्या दरम्यान पाऊस आणि वादळाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. शनिवारी होणाऱ्या या सामन्यावरही पावसाचं सावट आहे. हा सामना पावसानं रद्द झाला तर दोन्ही टीमना एक-एक पॉईंट दिला जाईल. त्यामुळे आरसीबीचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.
( नक्की वाचा : T20 World Cup : रोहित आणि आगरकरच्या मनाविरुद्ध झाली हार्दिक पांड्याची निवड! )
'प्ले ऑफ' चं समीकरण काय?
आरसीबीला 'प्ले ऑफ' गाठण्यासाठी चांगल्या रनरेटसह सीएसकेला पराभूत करणं आवश्यक आहे. 13 सामन्यानंतर आरसीबीचा रनरेट 0.387 इतका आहे. तो सीएसकेच्या 0.528 रनरेटपेक्षा कमी आहे. सीएसकेला रनरेटमध्येही मागं टाकण्यासाठी किमान 18 रननं सीएसकेचा पराभव करावा लागेल. आरसीबीनं दुसऱ्यांदा बॅटिंग केली तर त्यांनी विजयी लक्ष्य 18.1 ओव्हर्समध्ये जिंकावा लागेल. पावसाच्या अडथळ्यामुळे शनिवारचा सामना रद्द झाला तर दोन्ही टीमना 1-1 पॉईंट मिळेल. त्या परिस्थितीमध्ये आरसीबीचे 13 आणि सीएसकेचे 15 पॉईंट्स होतील. टॉप चारमध्ये जाण्याचं आरसीबीचं स्वप्न यामुळे पूर्ण होणार नाही
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कसं असेल हवामान?
Accuweather नं दिलेल्या अंदाजानुसार स्टेडियमच्या चारही बाजूला 99 टक्के ढगाळ वातावरण असेल. दुपारी काही काळ ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल. संध्याकाळी पावसाची शक्यता 74 टक्के आहे. तर तापमान 30 ते 34 अंश राहण्याची शक्यता आहे. रात्री 100 टक्के ढगाळ वातावरण असेल. तर पावसाची शक्यता 62 टक्के काही. काही भागात वादळ येण्याचीही शक्यता आहे. रात्रीचं तापमान 21-22 डिग्री सेल्सियसच्या आसपास असेल.
Chinnaswamy stadium has the best Sub-air drainage and aeration system. ❤️
— Tanuj Singh (@ImTanujSingh) May 17, 2024
- Hope for the best & We get to see full match on 18th May...!!!!! pic.twitter.com/S2lvnjuog2
पावसाचा अडथळा आला तर पूर्ण खेळ होण्याची शक्यता कमी होईल. आयपीएलच्या नियमानुसार सर्वात कमी पाच ओव्हर्सचा सामना होऊ शकतो. रात्री 10 वाजून 56 मिनिटं ही मॅच सुरु होण्याची शेवटची डेडलाईन आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world