
ICC Champions Trophy 2025, India vs Bangladesh : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारतानं विजयी सलामी दिली आहे. टीम इंडिया या स्पर्धेत विजेतेपदाची प्रबळ दावेदार आहे. दुबईत बुधवारी (20 फेब्रुवारी 2025) झालेल्या मॅचमध्ये भारतानं बांगलादेशचा 6 विकेट्सनं पराभव केला. आता टीम इंडियाची पुढील लढत 23 फेब्रुवारी (रविवार) पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. शुबमन गिल (Shubman Gill) आणि मोहम्मद शमी (Mohammed Shami) भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले.
कशी झाली मॅच?
बांगलादेशनं दिलेल्या 229 रन्सचा पाठलाग करताना रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुबमन गिल (Shubman Gill) यांनी चांगली सुरुवात केली. या दोघांमध्ये रोहित अधिक आक्रमक होता. रोहितला चांगल्या सुरुवातीनंतर मोठी खेळी करता आली नाही. तो 41 रन काढून आऊट झाला. तर अनुभवी विराट कोहलीनं 22 रन केले.
शुबमन गिलचा इंग्लंड विरुद्धच्या सीरिजमधील फॉर्म चॅम्पियन्स ट्रॉफीतही कायम आहे. त्यानं एक बाजू लावून धरत टीम इंडियाकडून सर्वात जास्त रन्स केले. मिडल ऑर्डरमधील श्रेयस अय्यर (15) आणि अक्षर पटेल (8) झटपट आऊट झाल्यानंतर त्यानं इनिंग सावरली. गिलनं वन-डे कारकिर्दीमधील 8 वी सेंच्युरी झळकावली. गिल 101 तर राहुल 41 रन्सवर नाबाद राहिले.
Sensational Shubman in prolific form! 🔥
— BCCI (@BCCI) February 20, 2025
Back to Back ODI HUNDREDS for the #TeamIndia vice-captain! 🫡🫡
Updates ▶️ https://t.co/ggnxmdG0VK#BANvIND | #ChampionsTrophy | @ShubmanGill pic.twitter.com/gUW8yI8zXx
भारताची आता पुढील लढत 23 फेब्रुवारीला पाकिस्तानशी आहे. टीम इंडियानं हा सामना जिंकल्यास त्यांचं सेमी फायनलमधील स्थान जवळपास निश्चित होईल. आपल्या ग्रुपमध्ये बांगलादेश आणि पाकिस्तानसह न्यूझीलंड ही आणखी एक टीम आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामना 2 मार्चला होईल.
बांगलादेशकडून तोहिदची सेंच्युरी
हिल्यांदा बॅटींग करताना बांगलादेशची टीम 228 रन्सवरच ऑल आऊट झाली. बांगलादेशकडून तौहीद ह्रदोयनं सेंच्युरी झळकावली. तो 100 रन काढून आऊट झाला. त्याला जाकेर अलीनं (68) चांगली साथ दिली.
(नक्की वाचा : Champions Trophy, Mohammed Shami: मोहम्मद शमीसारखं कुणी नाही, जग 'या' रेकॉर्डसाठी ठेवणार लक्षात )
भारताकडून मोहम्मद शमीनं सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. हर्षित राणानं 3 तर अक्षर पटेलला 2 विकेट्स मिळाल्या.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world