Rohit Sharma : रोहित शर्माच्या वाढलेल्या वजनावरून काँग्रेस प्रवक्त्याची टीका, भाजपचा काँग्रेसवर निशाणा

shama mohammed on captain rohit sharma : काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉ. शमा मोहम्मद यांनी रोहितच्या वाढलेल्या वजनावर टिप्पणी करत लठ्ठ म्हटलं आहे. तसेच याला भारतीय इतिहासातील सर्वात 'अप्रभावशाली' कर्णधार म्हटलं.

जाहिरात
Read Time: 2 mins

कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर आता टीम इंडियाचं लक्ष्य चॅम्पियन्स ट्रॉफीवर आहे. रोहित शर्मा आणि टीमचं सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉ. शमा मोहम्मद यांनी रोहितच्या वाढलेल्या वजनावर टिप्पणी करत त्याला लठ्ठ म्हटलं आहे. तसेच त्याला भारतीय इतिहासातील सर्वात 'अप्रभावशाली' कर्णधार म्हटलं.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी ट्वीट करत म्हटलं की, "रोहित शर्मा हा एक जाड खेळाडू आहे. त्याला वजन कमी करण्याची गरज आहे. भारताचा तो आतापर्यंतचा अकार्यक्षम कर्णधार." भारत विरुद्ध न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यादरम्यान शमा मोहम्मद यांनी एक्स अकाऊंटवरुन ही पोस्ट केली. 

(नक्की वाचा- IND Vs NZ: टीम इंडियाची विजयी हॅट्रिक! न्यूझीलंडचा 44 धावांनी धुव्वा; वरुण चक्रवर्ती ठरला हिरो)

शमा मोहम्मद इथेच थांबल्या नाही तर त्यांना रोहितला एक सामान्य कर्णधार आणि एक सामान्य खेळाडू म्हटलं. सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्या तुलनेत तो काहीच नाही. शमा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की. "गांगुली, तेंडुलकर, द्रविड, धोनी, कोहली, कपिल देव, शास्त्री आणि त्याच्या आधी आलेल्या इतर खेळाडूंच्या तुलनेत याच्यात इतके जागतिक दर्जाचे काय आहे? तो एक सामान्य कर्णधार आणि एक सामान्य खेळाडू आहे जो भाग्यवान होता की त्याला भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली."

(नक्की वाचा-  Ranji Trophy 2025: विदर्भाच्या वाघांचा रणजी ट्रॉफीवर कब्जा! एकही सामना न गमावता बनले चॅम्पियन)

मात्र हे प्रकरण आपल्या उलटत असल्याचे दिसताचा शमा मोहम्मद यांना सारवासारव केली. "मी कोणाचाही अपमान करण्यासाठी ट्विट केलेले नाही. त्या ट्विटमध्ये मी म्हटले होते की एक खेळाडू असल्याने त्याचे वजन जास्त आहे. हे बॉडी शेमिंग नाही. मी त्याला आधीच्या कर्णधारांशी तुलना केल्यामुळे तो एक अप्रभावी कर्णधार असल्याचे मी म्हटले. 

Advertisement
Topics mentioned in this article